-
ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिना अत्यंत खास असणार आहे. कारण- या महिन्यात नवग्रहातील काही ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, १३ सप्टेंबर रोजी मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. याचदरम्यान, मंगळ चित्रा आणि स्वाती नक्षत्रात गोचर करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी सूर्य सिंह राशीतून कन्या राशीमध्ये जाईल. तसेच बुध ग्रह सप्टेंबर महिन्यात सिंह आणि कन्या राशीत गोचर करेल आणि मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त आणि चित्रा नक्षत्रात गोचर करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच देवगुरू बृहस्पती संपूर्ण महिना मिथुन आणि पुनर्वसु नक्षत्रामध्ये राहतील. शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आणि उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये गोचर करेल. केतू सिंह राशीसह पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात राहतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच राहू कुंभ राशीसह पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात विराजमान असेल. या ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
सप्टेंबर महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम असेल. या दिवशी केलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठीही खूप लाभकारी असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीसाठीही या महिन्यातील ग्रहांचे गोचर दिवस खूप खास असेल. या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल, तणावमुक्त व्हाल. आयुष्यात मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
धनु राशीच्या व्यक्तींसाठीही सप्टेंबरमधील ग्रहांचे गोचर अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या लोकांसाठीही सप्टेंबर महिना आनंदात जाईल. या काळात अनेक आनंदी वार्ता कानी पडतील, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक चणचण भासणार नाही. या राशीच्या व्यापाऱ्यांनाही अनेक आर्थिक लाभ होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला