-
रात्री दूध जास्त उपयुक्त तज्ज्ञांच्या मते रात्री झोपण्यापूर्वी दूध घेणे अधिक फायदेशीर असते. हे शरीराला आराम देते, स्नायूंना पुनरुज्जीवित करते आणि गाढ झोप लागण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : Pexels)
-
अनेकांना शंका असते की सकाळी उपाशीपोटी दूध पिणे योग्य आहे का? याबाबत तज्ज्ञांचे मत वेगवेगळे आहे. (फोटो सौजन्य : Pexels)
-
सकाळी दुधाचे फायदे
उपाशीपोटी दूध घेतल्यास शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. यात असलेला लॅक्टोज शरीराला सक्रिय ठेवतो आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी इंधनासारखे काम करतो. (फोटो सौजन्य : Pexels) -
काहींना त्रासही होऊ शकतो
प्रत्येकाच्या पचनसंस्थेचा स्वभाव सारखा नसतो. ज्यांचे पचन कमजोर आहे त्यांना उपाशीपोटी दूध घेतल्याने अॅसिडिटी, गॅस, उलटी किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते. (फोटो सौजन्य : Pexels) -
पचनावर परिणाम
पचन नीट नसेल तर उपाशीपोटी दूध घेतल्याने पोट फुगणे, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारखे त्रास होऊ शकतात. (फोटो सौजन्य : Pexels) -
पोटात जडपणा व अॅसिडिटी
दूध किंचित आम्लीय (अॅसिडिक) स्वरूपाचे असते, त्यामुळे काहींना उपाशीपोटी दूध घेतल्यावर छातीत जळजळ, अॅसिडिटी किंवा उलटीसारखी समस्या जाणवते. (फोटो सौजन्य : Pexels) -
आयुर्वेदाचे मत
आयुर्वेदानुसार सकाळी उपाशीपोटी दूध पिणे फायदेशीर मानले जात नाही. दुधातील लॅक्टोजमुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते व शरीराला अपाय होऊ शकतो. (फोटो सौजन्य : Pexels) -
दूध पिण्याची योग्य वेळ
सकाळी दूध घ्यायचे असल्यास ते फळं, सुका मेवा किंवा बिस्किटांसोबत घेतले तर पचन सोपे होते आणि पोटही हलके राहते. (फोटो सौजन्य : Pexels) -
रात्री दूध जास्त उपयुक्त
तज्ज्ञांच्या मते रात्री झोपण्यापूर्वी दूध घेणे अधिक फायदेशीर असते. हे शरीराला आराम देते, स्नायूंना पुनरुज्जीवित करते आणि गाढ झोप लागण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : Pexels)

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत आणि अमेरिकेमध्ये खूप…”