-
केराटिन काय आहे?
केराटिन हे एक प्रथिन (protein) आहे; जे केस, नखे व त्वचा यांच्या मजबुतीसाठी साह्यभूत ठरते. केसांना केराटिन मिळाल्यास केस घनदाट, मजबूत व चमकदार होतात. (फोटो सौजन्य: फ्रीपिक) -
पण, आता केसांवर केराटिनची रासायनिक प्रक्रिया न करताच ‘हा’ प्रथिनयुक्त पदार्थ केसांनामिळू शकणार आहे. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
अंडी
अंडी ही बायोटिन आणि प्रथिनांनी भरपूर असतात. त्यामुळे नैसर्गिकरीत्या केसांमध्ये केराटिन तयार होण्यास मदत मिळते आणि केस मजबूत करतात. (फोटो सौजन्य: फ्रीपिक) -
रताळे
रताळ्यात बीटा-केराटिन हा घटक असतो, जो शरीरात व्हिटॅमिन एमध्ये वाढ करतो आणि केसांच्या वाढीसाठी ते आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: फ्रीपिक) -
मासे
माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आणि प्रथिने असतात. त्यामुळे केसांना मजबुती मिळते आणि ते चमकदार बनतात. (फोटो सौजन्य: फ्रीपिक) -
सूर्यमुखी बियाणे
सूर्यमुखी बियाणे व्हिटॅमिन ईने समृद्ध असते, जे डोक्याच्या त्वचेसाठी (स्कॅल्प) आणि कोंडा कमी करणासाठी उपयुक्त ठरते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक) -
पालक
पालकात आयर्न, फोलेट, व्हिटॅमिन ए आणि C भरपूर असतात. हे घटक केसांच्या निर्मितीसाठी मदत करतात आणि त्यामुळे केस दाट होतात. (फोटो सौजन्य: फ्रीपिक) -
गाजर
गाजरामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन A ने समृद्ध असते, ज्यामुळे केसांची नैसर्गिक वाढ सुधारते आणि त्यामध्ये केराटिनचा वापर योग्य प्रमाणात होतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक) -
मांसहारी पदार्थ
हे पदार्थ प्रथिनांनी समृद्ध आहेत, जे केसांची वाढ आणि मजबुतीसाठी आवश्यक आहेत. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या