-
काही पुस्तकं अशी असतात जी आपल्याला वैयक्तिक विकासात खूप मदत करतात. आज आम्ही तुम्हाला अशा सहा पुस्तकांची माहिती देणार आहोत जी तुमची एकाग्रता वाढवण्यास, लक्ष केंद्रीत करण्यास आणि उत्पादकता वाढवण्यास मदत करतील. (Photo Source : amazon.in)
-
जेम्स क्लियर लिखित अॅटॉमिक हॅबिट्स : आपल्या दैनंदिन सवयींमधील लहान लहान बदल कसे मोठ्या प्रमाणात परिणामकारक ठरू शकतात ते जाणून घायचं असेल तर जेम्स क्लियर लिखित अॅटॉमिक हॅबिट्स एकदा वाचायलाच हवं. ज्यामुळे तुम्हाला सातत्य आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. (Photo Source : amazon.in)
-
कॅल न्यूपर्ट लिखित डीप वर्क : विचलित जगात लक्ष केंद्रित करण्यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक पुस्तक जे तुम्हाला खोलवर आणि कार्यक्षमतेने कसं काम करता येईल ते शिकवतं. (Photo Source : amazon.in)
-
ग्रेग मॅककाउन यांनी लिहिलेले “अॅसेन्शियलिझम – द डिसिप्लिन्ड पर्स्युट ऑफ लेस” : खरोखर महत्त्वाच्या आहेत अशा गोष्टींना प्राधान्य कसं द्यायचं आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी काय बदल करायचे याबाबत मार्गदर्शक असं पुस्तक. स्वतःचा शोध घ्यायला मदत करेल असं हे पुस्तक वाचायला हवं. (Photo Source : amazon.in)
-
गॅरी केलर आणि जे पापासन यांचे ‘द वन थिंग’ : तुमच्या कारकिर्दीत आणि जीवनात सर्वात मोठा प्रभाव पाडणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक मार्गदर्शक असं पुस्तक. (Photo Source : amazon.in)
-
जोहान हॅरी यांचे स्टोलन फोकस : आपले लक्ष वेधण्याचे प्रमाण का कमी होत आहे, चांगलं लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी ते कसे परत मिळवायचे याचा संशोधन आधारित लेखाजोखा या पुस्तकात वाचायला मिळेल. (Photo Source : amazon.in)
-
Indistractable by Nir Eyal : हे पुस्तक वाचून लक्ष विचलित करण्याचे मानसशास्त्र समजून घेता येईल आणि त्यावर मात करून एकाग्रता वाढवण्यास मदत होईल. (Photo Source : amazon.in)
Asia Cup Final: भारत-पाकिस्तान फायनलसाठी कसं आहे समीकरण? पाक संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी काय करावं लागणार? वाचा सविस्तर