-
भारतात अनेक सुंदर व रंगीबेरंगी शहरं आणि पर्यटनस्थळं आहेत. यापैकी काही पर्यटनस्थळं निसर्गरम्य आहेत, यासह तिथली संस्कृती देखील अनुभवण्यासारखी आहे. (Photo Source : unsplash and wikimedia commons)
-
चेट्टीनाड, तमिळनाडू : चेट्टीनाड हे शहर सुंदर टाइल्सने सजवलेल्या हवेल्या, वाडे आणि त्यासमोरील सुंदर अंगणांसाठी प्रसिद्ध आहे. येथील घरांच्या रचनेपासून रंगसंगतीपर्यंत प्रत्येक गोष्टीतून तमिळ वारसा पाहायला मिळतो. (Photo Source : unsplash and wikimedia commons)
-
जोथपूर, राजस्थान : मेहरानगढ किल्ल्याच्या आसपास तुम्हाला निळ्या रंगाने रंगवलेली घरं, वाडे आणि हवेल्या पाहायला मिळतील. (Photo Source : unsplash and wikimedia commons)
-
मदुराई, तमिळनाडू : पूर्वेकडील अथेन्स अशी ओळख मिरवणारं हे शहर मीनाक्षी मंदिर आणि येथील आकर्षक घरांमुळे प्रसिद्ध आहे. (Photo Source : unsplash and wikimedia commons)
-
पणजी, गोवा: गोव्याची राजधानी पणजी हे शहर पोर्तुगीज काळातील रंगीबेरंगी घरं, लॅटिन क्वार्टरचे रस्ते आणि नदी किनारी असलेल्या शिस्तबद्ध बाजारांमुळे अधिक आकर्षक बनलं आहे. (Photo Source : unsplash and wikimedia commons)
-
शेखावाटी, राजस्थान : Open Air Art Gallery of India म्हणून ओळखलं जाणारं शेखावाटी हे शहर उत्कृष्ट भित्तिचित्रे आणि रंगेबेरंगी हवेल्यांसाठी प्रसिद्ध आहे. (Photo Source : unsplash and wikimedia commons)
-
झिरो, अरुणाचल प्रदेश : या पर्यटनस्थळी तुम्हाला सर्वत्र हिरवळ पाहायला मिळेल. सर्वत्र धान्यशेती, बांबूपासून बनवलेली घरं, रंगीबेरंगी वस्त्यांमुळे हे शहर खूप आकर्षक बनलं आहे. येथील रस्त्यांवरून फिरताना प्रत्येक चौकात तुम्हाला फोटो काढावासा वाटेल. (Photo Source : unsplash and wikimedia commons)

‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात…