-
ग्रीन टी आणि ब्लॅक टी दोन्ही Camellia sinensis या वनस्पतीपासून मिळतात; परंतु त्यांची प्रक्रिया वेगळी आहे. ग्रीन टीवर कमी प्रक्रिया केली जाते; तर ब्लॅक टी फर्मेंटेशन प्रक्रियेतून तयार होतो.
-
ग्रीन टी हलक्या प्रक्रियेमुळे आपला हिरवट रंग टिकवते आणि त्यात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
-
ब्लॅक टी फर्मेंटेशनमुळे गडद रंग व तीव्र चव निर्माण करतो, तसेच त्यात अँटीऑक्सिडंट्स वाढते, जी केसांच्या आरोग्यास उपयोगी आहे.
-
ग्रीन टीचा वापर महिलांमध्ये केस गळती कमी करण्यासाठी, डँड्रफ टाळण्यासाठी, केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी होतो. तसेच ग्रीन टी शँपू आणि हेअर प्रॉडक्ट्समध्ये सहज उपलब्ध आहे.
-
ग्रीन टीचा वापर महिलांमध्ये केस गळती कमी करण्यासाठी, डँड्रफ टाळण्यासाठी, केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी होतो. तसेच ग्रीन टी शँपू आणि हेअर प्रॉडक्ट्समध्ये सहज उपलब्ध आहे.
-
ग्रीन टीसाठी पद्धत : चहा उकळून थंड करा. नंतर डोक्याला आणि केसांना लावा. काही मिनिटांनी केस धुवा. या चहामध्ये ऑलिव्ह ऑइल, अंड्याचा पिवळा, मध यांसारखे घटक मिसळून मास्कही तयार करता येतो.
-
काळा चहा वापरण्याची पद्धत: ६ टी-बॅग वापरून मजबूत चहा तयार करा. नंतर तो थंड करून केसांवर १५ मिनिट रलाऊन ठेवा नंतर शपू व कंडिशनर वापरा; आठवड्यात ३ वेळा करता येईल.
-
तज्ज्ञांच्या मते ग्रीन टी अधिक उपयुक्त आहे, कारण त्यात EGCG नावाचा शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जो केस फॉलिकल्स उत्तेजित करतो, फ्री रेडिकल्स कमी करतो आणि DHT हार्मोन नियंत्रित करतो.
-
काळा चहा सुद्धा फायदेशीर आहे, पण त्यातील जास्त कॅफिनमुळे जास्त प्रमाणात वापरल्यास केस वाढ हळूहळू होऊ शकते; त्यामुळे केसांची घनता आणि गळती कमी करण्यासाठी ग्रीन टी अधिक उपयुक्त ठरते.(फोटो सौजन्य : FreePik)

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल