-
मधुमेह किंवा प्रीडायबिटीजचे नियोजन करणे म्हणजे फळांचे सेवन पूर्णपणे टाळणे असे काही नाही. आज आपण अशा सहा फायबरने समृद्ध, कमी ग्लायसेमिक असलेल्या फळांबद्दल जाणून घेणार आहोत जी रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास आणि एकूण आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात.
-
सफरचंद: सफरचंदांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यात विरघळणारे फायबर (पेक्टिन) भरपूर असते, जे ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
-
बेरी: बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात, ज्यामुळे साखरेचे प्रमाण न वाढवता गोड पदार्थ खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे एक बेस्ट फळ आहे.
-
पेरू: फायबर आणि व्हिटॅमिन सी ने भरपूर असलेला पेरू साखरेचे शोषण कमी करतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासून रोखतो.
-
जांभूळ: हे हंगामी फळ इन्सुलिनची क्रिया सुधारण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी ओळखले जाते.
-
किवी: किवीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर हे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी एक उत्कृष्ट फळ आहे.
-
नाशपाती: नाशपातीमध्ये ग्लायसेमिक लोड कमी असतो आणि ते हळूहळू नैसर्गिक साखर सोडतात, ज्यामुळे हे उर्जेची पातळी एकसारखी राहण्यास मदत करते.

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…