-
हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. यंदा २२ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार असून १ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल,
-
नवरात्रीच्या काळात देवीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी लोक विविध स्तोत्र, मंत्राचे पठण करतात परंतु यासह तुम्ही तुमच्या राशीनुसार शुभ असलेल्या रंगाचा जास्तीत जास्त वापर केल्यास देवीची आई तुमच्यावर प्रसन्न होईल. -
मेष आणि वृश्चिक राशीसाठी लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे नवरात्रीत तुम्ही या रंगाचा वापर करा. हा रंग तुमचे भाग्य उजळण्यास मदत करेल.
-
वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांनी गुलाबी, पांढरा रंगाचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. यामुळे तुमचे वैवाहिक जीवनही सुखमय होईल.
-
मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी नवरात्रीच्या काळात हिरव्या, पोपटी, मोरपंखी अशा रंगांचा वापर करायला हवा. या रंग तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येईल.
-
कर्क राशीच्या लोकांसाठी पांढरा, सिलव्हर आणि हलके रंग शुभ असतील. हे रंग तुमच्या आयुष्यात मानसिक शांतता घेऊन येतील.
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी नारंगी, गोल्डन हे रंग खूप फायदेशीर असतील. हा रंग तुमचे नशीब चमकवण्यास कारणीभूत ठरू शकतो.
-
धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी पिवळा रंग अत्यंत शुभ ठरेल. हा रंग तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रात अधिक यश मिळवून देईल तसेच तुमच्या करिअरमध्येही सकारात्मक बदल होतील.
-
मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी निळा, जांभळा आणि राखाडी रंग अधिक फायदेशीर ठरेल. हा रंग नकारात्मक ऊर्जेपासून तुमचे संरक्षण करेल.

US H 1B Visa News: ‘रविवारच्या आधी अमेरिकेत परत या’, ट्रम्प यांच्या निर्णयामुळं Microsoft, Amazon कंपन्यांची धावाधाव; कर्मचाऱ्यांना दिला इशारा