-
प्रत्येक घरात फर्निचरचा वापर केला जातो. लोक त्यांचे घर सुंदर, आकर्षक करण्यासाठी आणि दैनंदिन जीवन आरामदायी बनवण्यासाठी फर्निचर खरेदी करतात. परंतु, दररोजच्या धावपळीमुळे ते साफ करायला वेळ मिळत नाही. .(फोटो सौजन्य: @Freepik)
-
परिणामी, त्यामुळे फर्निचरवर धूळ साचते आणि ते काळपटही दिसू लागतात. दिवाळीसारख्या खास प्रसंगी लोक फर्निचर स्वच्छ करण्यासाठी कारागीरांनाही बोलावतात. तथापि, यासाठी पैसे खर्च करावे लागतात. .(फोटो सौजन्य: @Freepik)
-
रसायने आधारित स्प्रेचा जास्त वापर केल्याने फर्निचरवरची चमक कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही सर्वात महागडे किंवा जुने फर्निचरदेखील स्वच्छ करण्यासाठी काही नैसर्गिक घटक वापरू शकता.
-
यासाठी तुम्ही १/२ कप नारळाचे तेल, १/४ कप ताज्या लिंबाचा रस, एक स्प्रे बॉटल, मऊ मायक्रोफायबरचा हे साहित्य कपडा वापरा.
-
सर्वप्रथम एका बाटलीत नारळाचे तेल आणि लिंबाचा रस घाला आणि नंतर हे एकत्र चांगले मिसळा. -
तयार केलेले द्रावण वापरण्यापूर्वी फर्निचरवरील धूळ कापडाने काढून टाका. नंतर बाटलीतील मिश्रण मायक्रोफायबर कापडावर स्प्रे करा.
-
फर्निचर स्वच्छ करण्यासाठी कापडाचा वापर करा. यामुळे त्याची चमक कमी न होता त्यावरील सर्व घाण, धूळ स्वच्छ होईल.
-
फर्निचर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस वापरू शकता. प्रथम फर्निचरवरील घाण साफ करा. नंतर व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळून स्प्रे करा.
-
डाग काढून टाकण्यासाठी फर्निचरवर स्प्रे करा. नंतर त्याची चमक परत मिळवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस मिसळा आणि फर्निचरवर लावा. (फोटो सौजन्य: Freepik)

US H 1B Visa News: ‘रविवारच्या आधी अमेरिकेत परत या’, ट्रम्प यांच्या निर्णयामुळं Microsoft, Amazon कंपन्यांची धावाधाव; कर्मचाऱ्यांना दिला इशारा