-
पोळी आणि तांदूळ हे दोन्ही भारतीय आहारातील मुख्य घटक आहेत; परंतु पचन प्रक्रिया व आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्यात महत्त्वाचा फरक आहे.
-
पोळी, विशेषतः गव्हाच्या किंवा मल्टीग्रेन पिठापासून बनवलेली असते आणि त्यात फायबर भरपूर असते. त्यामुळे जेवणानंतर जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं.
-
मात्र, रात्री पोळी थोडी जड वाटू शकते. पचन मंदावल्यामुळे झोपताना पोट फुगणं किंवा पोट जड झाल्यासारखं वाटू शकतं.
-
दुसरीकडे तांदळाच्या, विशेषतः पांढऱ्या तांदळाच्या भातात कमी फायबर असल्यामुळे तो सहज आणि पटकन पचतो. त्यामुळे रात्री तो पोटासाठी हलका पडतो.
-
भाताचं पचन जलद गतीनं होत असल्यामुळे रात्री जेवल्यानंतर अधिक शांत आणि आरामदायी झोप मिळू शकते.
-
परंतु, भात लवकर पचल्यामुळे पुन्हा भूक लागण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे डाळ, भाजी किंवा प्रथिनांसोबतच भात खाणं गरजेचं आहे.
-
रात्रीचं जेवण फक्त कार्बोहायड्रेटवर आधारित न ठेवता, त्यात भाज्या, प्रथिने आणि मर्यादित तेलाचा समावेश केल्यास पचन व्यवस्थित होतं.
-
रात्री शारीरिक हालचाल कमी होत असल्यानं पचन नैसर्गिकरीत्या मंद होतं; जड जेवण टाळल्यास पोटदुखी किंवा अॅसिडिटीसारखे त्रास कमी होतात.
-
शेवटी प्रत्येकाच्या पचनशक्तीनुसार वेगवेगळी निवड केली जाते. काहींना पोळी चांगली लागते, तर काहींना तांदूळ हलका वाटतो. शरीराला योग्य काय ते अनुभवातून ठरवणं उत्तम ठरतं.(फोटो सौजन्य : FreePik)

“एकही NRI भारतात यायला तयार नाही,” IIT मुंबईची माजी विद्यार्थिनी म्हणाली,”फुकट योजना, आरक्षण आणि…”