-
तुम्हीही व्यायामाची सुरूवात करणे पुढे ढकलत आहात का? असं करणारे तुम्ही एकटे नाही आहात. उत्साहाने व्यायाम कसा सुरू करायचा त्याचे ६ सोपे उपाय आज आपण जाणून घेऊयात…
-
लहान सुरुवात करा: फक्त ५ मिनिट हालचाल करा, त्यात चालणे, काही स्ट्रेचिंग किंवा सोपा योग करा. बहुतेक लोक एकदा अशी सुरुवात केली की पुढे छान रमून व्यायाम करु लागतात.
-
एखाद्या बैठकीसारखे वेळापत्रक तयार करा: तुमच्या कॅलेंडरवर तुमचा व्यायामाचा वेळ मार्क करा. तो स्वतःशी एक अजिबात न टाळता येणारी अपॉइंटमेंट म्हणून स्वीकारा.
-
तुम्हाला आवडणारी अॅक्टिव्हिटी निवडा: धावणे आवडत नसेन तर नृत्य, सायकलिंग किंवा योग करून पहा. तुम्हाला खरोखर आनंद देणाऱ्या वर्कआउट्स करत राहण्याचा प्रयत्न करा.
-
आगाऊ तयारी करा: आदल्या रात्री व्यायामाचे कपडे आणि शूज तयार ठेवा. यामुळे निर्णय घेण्याचा विचार दूर होतो आणि सुरुवात करणे सोपे होते.
-
एक जबाबदार सहकारी मिळवा: मित्रांसोबत व्यायाम करा किंवा फिटनेस क्लासमध्ये सामील व्हा. तुमच्याशी कोणीतरी तुमच्यासारखा धेय्य ठेवाणारा व्यक्ती फायदेशिर ठरु शकतो.
-
स्वतःला बक्षीस द्या: लहान अचिव्हमेंट्स सेलिब्रेट करा. सकारात्मक राहा. व्यायामानंतर रिलॅक्स करा, स्मूदी एन्जॉय करा.
हेही पाहा- एक सेकंदही… पृथ्वी फिरायची थांबली तर…? हार्वर्ड विद्यापिठातील खगोलशास्त्रज्ञाने दिलंय उत्तर…

IND vs BAN Live, Asia Cup 2025: एकच नंबर! सूर्याचा भन्नाट थ्रो अन् जाकीर अली धावबाद