-
सध्या भारतातल्या धकाधकीच्या आयुष्यामुळे, स्क्रीन टाइम, कामाचा ताण यामुळे झोपेचं प्रमाण कमी झालं आहे. हाऊ इंडिया स्लीप्स च्या सर्वेनुसार ६१ टक्के भारतीय रोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेतता. यामुळे स्लीप टुरिझमची चर्चा सध्या भारतात होते आहे. हा ट्रेंड काय आहे? जाणून घेऊ.
-
ऋषिकेश या ठिकाणी एक वेलनेस रिट्रीट आहे. इथे भेट देणाऱ्या लोकांना स्नायू, मज्जासंस्था यांना आराम देण्यासाठी स्पा थेरेपी अवलंबली जाते. ध्यान सत्रंही आयोजित केली जातात. शिरोधारा उपचार पद्धतीही अवलंबली जाते. त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.
-
आत्मंतन वेलनेस रिसोर्ट महाराष्ट्रातील मुळशी या ठिकाणी आहे. इथेही योग, श्वासोश्वास, मॅग्नेशियम घटक असलेले जेवण आणि स्पा थेरेपी यांचा समावेश आहे. या ठिकाणीही भेट देणाऱ्यांची झोप सुधारण्यास मदत होते.
-
कर्नाटकातील गोकर्ण या ठिकाणी स्वस्वर नावाचं रिसोर्ट आहे या ठिकाणीही आयुर्वेदिक मसाज, तंत्रज्ञानमुक्त जीवनशैलीचा अनुभव घेता येतो. झोपेची सायकल नैसर्गिकरित्या परत मिळवता येते.
-
डेहराडून वाना या ठिाकणी माइंडफुलनेसवर भर दिला जातो. तिबेटीयन ध्यानधारणा पद्धती, आयुर्वेदिक उपचार आणि निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणीही झोप पूर्ण कशी करावी हे शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवलं जातं.
-
हेच भारतातलं स्लीप टुरिझम आहे. आरोग्यासाठी आणि चांगल्या झोपेसाठी गुंतवणूक म्हणून या स्पा आणि आयुर्वेदिक सेंटर्सकडे पाहिलं जातं. भारतातील वेलनेस मार्केट ६.३ टक्के CAGR ने वाढतं आहे. प्रवाशांना विश्रांती देणाऱ्या निरोगी ठेवणाऱ्या स्पा आणि वेलनेस सेंटरची संख्या वाढते आहे.

या वयातही उत्साह कायम! ७० वर्षाच्या आजीबाईंनी धरला गरब्यावर ठेका; गावाकडचा VIDEO व्हायरल