-
ज्या पद्धतीने तुम्ही दररोज दात खासल्याने तुमचे तोंड स्वच्छ होते, अगदी त्याच पद्धतीने इमोशनल हायजीन ठेवल्याने तुमचे मन देखील निरोगी राहते. लहान पण सातत्याने पाळलेल्या सवयी तुम्हाला इमोशनल बर्नआऊट, वाचवतात आणि एकूण मानसिक आरोग्य वाढवू शकतात. आजपासूनच तुम्ही सुरू करू शकता अशा ६ प्रभावी सवयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Source: Photo by Unsplash )
-
सीमा निश्चित करणे शिकून घ्या – एखाद्या गोष्टीला गरज असेल तेव्हा नाही म्हणणे हे देखील स्वतःची काळजी घेणेचआहे. सीमा निश्चित केल्याने तुमची मेंटल स्पेस सुरक्षित राहाते आणि भावनिक थकवा येत नाही. (Source: Photo by Unsplash )
-
भावनांची काळजी घ्या – दररोज ५ मिनिटे वेळ काढा आणि स्वतःला विचारा की मला सध्या कसं वाटतंय? तुमच्या भावना ओळखल्याने त्यांची तीव्रता कमी होते आणि तुम्हाला त्यांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्यास मदत होते. (Source: Photo by Unsplash)
-
दररोज ज्या ३ गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ आहात त्या लिहून ठेवल्याने तुमचा मेंदू तुम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन जातो आणि तुमची भावनिक लवचिकता वाढते. (Source: Photo by Unsplash )
-
नकारात्मक विचारांना आव्हान द्या – तुमच्या मनात आपोआप येणाऱ्या नकारात्मक विचारांना आव्हान द्या. त्यासाठी स्वतःला विचारा: “हे खरंच सत्य आहे का?” आणि त्यानंतर, त्या विचारांना संतुलित आणि वास्तववादी विचारांनी बदला.(Source: Photo by Unsplash )
-
मन मोकळे करा आणि बोला – तुमच्या भावना मनात दडपून ठेवू नका . त्या विश्वासू मित्र, मैत्रीण, रोजनिशी किंवा थेरपिस्ट यांना सांगा. भावना व्यक्त केल्याने शरीरात अंतर्गत तणाव जमा होणे टाळता येते. (Source: Photo by Unsplash)
-
डिजिटल डिटॉक्स: दररोज स्क्रीन आणि सोशल मीडियापासून लहान ब्रेक घ्या. यामुळे तुम्ही भावनिक गोंधळ आणि तुलनेतून मनाला येणारा थकवा यापासून सुरक्षित राहता.

प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार?