-
हृदयाचा कर्करोग : दुर्मीळ; पण गंभीर आजार हृदयाचा कर्करोग हा अत्यंत दुर्मीळ असून, तो जगभरात कमी रुग्णांमध्ये आढळतो. या आजाराचे निदान वेळेवर न झाल्यास तो जीवनासाठी धोका निर्माण करू शकतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
दोन मुख्य प्रकार हृदयाचा कर्करोग मुख्यतः दोन प्रकारांचा असतो – प्राथमिक आणि द्वितीयक. प्राथमिक कर्करोग हृदयाच्या स्वतःच्या ऊतकांमध्ये निर्माण होतो; तर द्वितीयक कर्करोग इतर अवयवांमधून हृदयात पसरतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
प्राथमिक हृदय कर्करोग प्राथमिक हृदय कर्करोगाचा सर्वांत सामान्य प्रकार म्हणजे अँगिओसारकोमा. हा ट्यूमर हृदयाच्या उजव्या अत्रियामध्ये आढळतो आणि तो अत्यंत आक्रमक स्वरूपाचा असतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
द्वितीयक हृदय कर्करोग द्वितीयक कर्करोग म्हणजे इतर अवयवांमधून हृदयात पसरलेला कर्करोग. फुप्फुस, स्तन, मूळव्याध किंवा लिंफोमा यांसारख्या अवयवांमधील कर्करोग पेशी हृदयात पोहोचून ट्यूमर तयार करतात. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
लक्षणे हृदयाचा कर्करोग विविध लक्षणे दर्शवितो. त्यात श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना, हृदय गतीत असामान्यता, थकवा, फुफ्फुसात द्रव साचणे, वेदना व वजन कमी होणे यांचा समावेश होतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
कारणे आणि जोखीम घटक प्राथमिक हृदय कर्करोगाचे नेमके कारण अजून स्पष्ट नाही. काही अभ्यासांनी POT1 या जीनमधील बदल याचा संबंध असू शकतो. द्वितीयक कर्करोग इतर अवयवांमधील कर्करोग पेशींमुळे हृदयात होतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
उपचाराचे पर्याय हृदयाचा कर्करोग ट्यूमरचा प्रकार, आकार, स्थान व रुग्णाच्या आरोग्यावर अवलंबून उपचार केला जातो. सर्जरीद्वारे ट्यूमर काढणे, रसायनोपचार (Chemotherapy) व किरणोपचार (Radiation Therapy) हे उपचार यामध्ये महत्त्वाचे आहेत. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
निदान पद्धती हृदयाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी इको कार्डिओग्राफी, CT Scan, MRI, ECG व कोरोनरी अँजिओग्राफी यांचा उपयोग केला जातो. या पद्धतींचा उपयोग करून ट्यूमरचे स्थान, आकार आणि हृदयावरील परिणाम यांचे मूल्यांकन केले जाते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक हृदयाचा कर्करोग हा दुर्मीळ असला तरी तो गंभीर आजार आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच त्वरित हृदय तज्ज्ञ किंवा ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून वेळेवर उपचार करून आयुष्य वाचवता येईल. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!