-
आपण कोणत्या वेळी उठतो, जेवतो याचा चांगला-वाईट परिणाम शरीरावर होत असतो. कामाच्या ताणामुळे डोके दुखणे, पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणे, एकाच ठिकाणी खूप वेळ बसल्यावर पाठ दुखणे आदी समस्या अनेकांना जाणवू लागल्या आहेत. थकवा, श्वास घेण्यात अडचण, अशक्तपणा यांसारख्या समस्यांचा त्रास वृद्ध लोकांनाच नाही, तर तरुण मंडळींनाही जास्त प्रमाणात होऊ लागला आहेत. या सगळ्या समस्यांना अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि वाईट खाण्याच्या सवयी कारणीभूत आहेत, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा हळूहळू कमी होत जाते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
शरीराला ते सक्रिय राहण्यासाठी पुरेसे इंधन अन् योग्य प्रमाणात पोषण मिळाले नाही, तर ऊर्जा आणि तब्येत बिघडल्यावर सहनशक्ती कमी होते. अशा परिस्थितीत आहारात काही गोष्टींचा समावेश करण्याबरोबर स्वतःला चांगल्या सवयीसुद्धा लावून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी काही जण दररोज सकाळी १० हजार पावले चालायचे ठरवतात. पण, मग दुसऱ्या दिवशी एवढं अधिक चालल्यामुळे पाय दुखू लागतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली ‘इंटरव्हल वॉकिंग’ चालण्याची ही पद्धत समोर आली आहे; जी कमी वेळेत खूप जास्त फायदे देऊ शकते. या पद्धतीसाठी महागडी उपकरणे किंवा जिमची आवश्यकता नाही. फक्त ३० मिनिटे चालण्याची ही पद्धत केवळ वजनच कमी करीत नाही, तर रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि स्नायूंच्या ताकदीतही सकारात्मक बदल घडवून आणते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, अलीकडेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली चालण्याची पद्धत समोर आली आहे; जी कमी वेळेत खूप जास्त फायदे देऊ शकतेस. या पद्धतीसाठी महागड्या उपकरणे किंवा जिमची आवश्यकता नाही. फक्त ३० मिनिटे चालण्याची ही पद्धत केवळ वजन कमी करत नाही तर रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि स्नायूंच्या ताकदीत देखील सकारात्मक बदल घडवून आणते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
रक्तदाब – अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सतत औषधांवर अवलंबून असलेल्या लोकांना ‘इंटरव्हल वॉकिंग’प्रमाणे चालल्याने रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे वृद्धांनादेखील याचा फायदा होईल.
-
सांधे आणि स्नायू – धावण्यापेक्षा ‘इंटरव्हल वॉकिंग’ पद्धतीने चालण्यामुळे गुडघे आणि पाठीवर कमी दबाव पडतो; ज्याचा फायदा सांधेदुखी, संधिवात किंवा पाठदुखीने त्रस्त असलेल्या लोकांना होऊ शकतो. चालताना कधी मध्यम, तर कधी जलद, अशा रीतनीने चालल्याने स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो आणि सांध्यांवर जास्त ताण येत नाही.
-
चरबी – ‘इंटरव्हल वॉकिंग’मुळे शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी चरबीचा वापर करणे भाग पडते. त्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी करण्यात मदत होते. त्याचप्रमाणे स्नायूंमध्ये इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते, रक्तातील साखर नियंत्रित राहते. ही पद्धत मधुमेही रुग्णांसाठी औषधाबरोबर एक नैसर्गिक उपचार म्हणून काम करते. जर तुम्ही दररोज फक्त अर्धा तास ‘इंटरव्हल वॉकिंग’ केलं त, तर काही आठवड्यांत त्याचे फायदे दिसू लागतील.
-
… तर जपानची ही चालण्याची पद्धत नेमकी कशी फॉलो करायची ?
त्यासाठी पहिल्यांदा तीन मिनिटे हळूहळू चालावे.
नंतर तीन मिनिटे वेगाने चाला.
एकूण ३० मिनिटे हा क्रम पाच वेळा पुन्हा पुन्हा करा.
जर तुम्ही पहिल्यांदाच चालत असाल, तर १८ मिनिटे व तीन फेऱ्या अशी सुरुवात करा. नंतर हळूहळू वेग आणि वेळ वाढवा.

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!