-
पुरेशी विश्रांती घ्या : ताप आल्यावर शरीराला लढण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी पुरेशी झोप आणि आराम घेणे अत्यंत आवश्यक आहे. कामाच्या व्यापात किंवा सतत हालचालींमध्ये गुंतल्यास पुनर्प्राप्ती मंदावू शकते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
भरपूर पाणी प्या : ताप, उलटी किंवा घसा कोरडा झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकते, त्यामुळे दिवसातून पुरेसे पाणी, हर्बल चहा किंवा इलेक्ट्रोलाइट्स असलेली पेये घेतल्यास शरीर लवकर बरे होऊ शकते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
कॅफीन आणि मद्यपान टाळा : कॉफी, चहा किंवा मद्यपानामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि रोगप्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम होतो. हळूहळू बरे होण्यासाठी हे टाळणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
हलका आणि पौष्टिक आहार घ्या : फळे, भाज्या, प्रोटीनयुक्त पदार्थ आणि सूप यांचा समावेश आहारात केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
तिखट, तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा : अशा प्रकारचे अन्न पचनसंस्थेला त्रास देते आणि शरीरावर अतिरिक्त ताण निर्माण करते, ज्यामुळे बरे होण्याची प्रक्रिया मंदावते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
झोपेची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष द्या : दररोज ७ ते ९ तासांची शांत झोप घेणे शरीराच्या पुनर्प्राप्तीसाठी आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमी करून वातावरण शांत ठेवणे उपयुक्त ठरते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
डॉक्टरांचा सल्ला घ्या : तापाची लक्षणे जाणवतात, तेव्हा ४८ तासांच्या आत डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. लवकर वैद्यकीय सल्ला घेतल्यास अँटीव्हायरल औषधांचा लाभ त्वरीत मिळतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
अँटीव्हायरल औषधे वेळेवर सुरू करा : योग्य वेळी औषध सुरू केल्यास शरीरातील विषाणूंची क्रिया कमी होते आणि बरे होण्याची वेळ लघू होते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
गंभीर लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या : ताप, छातीत दुखणे, श्वास घेण्यात अडचण किंवा सतत उलटी यांसारखी गंभीर लक्षणे दिसल्यास विलंब न करता वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS