-
ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मतारीख, वेळ व ठिकाण या गोष्टींचा अभ्यास करून प्रत्येक व्यक्तीची कुंडली काढली जाते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्याव्यतिरिक्त १२ राशी, २७ नक्षत्रे, मूलांक, भाग्यांक, जन्म वार, जन्म महिना यांच्यावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण, अवगुणांबद्दल भाष्य केले जाते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
दरम्यान, आज आपण १२ राशींतील अशा काही पुरुषांबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपल्या बायकोवर हुकुमत गाजवतात. स्वतःचे म्हणणे खरे करून बायकोला आपल्या मुठीत ठेवतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अशा पुरुषांशी विवाह केल्याने महिलांना अनेक खडतर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी असून , तो भौतिक सुखाचा कारक ग्रह आहे. या राशीचे पुरुष अत्यंत रोमँटिक असतात. ते आपल्या पत्नीबरोबर प्रामाणिकही असतात; परंतु त्यांना स्वतःचे म्हणणे खरे करायला आवडते. त्यामुळे त्यांच्यापुढे त्यांच्या बायकोचे काहीच चालत नाही. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुध हा कन्या राशीचा स्वामी असून, तो वाणी, विद्या व बुद्धीचा कारक ग्रह आहे. या राशीचे पुरुष खूप बुद्धिमान असतात. परंतु, लग्नानंतर ते आपल्या पत्नीवर वर्चस्व गाचवण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःच्या आवडी-निवडींना प्राधान्य देतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू हा मीन राशीचा स्वामी असून, तो धन-संपत्ती आणि ज्ञानाचा कारक ग्रह आहे. या राशीच्या पुरुषांना सतत बायकोमधील दुर्गुण बोलून दाखवण्याची सवय असते. त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन क्लेशकारक ठरते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: Freepik आणि लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पैसा, मोठ्या पगाराची नोकरी, गाडी; नोव्हेंबरमध्ये शुक्राचा पॉवरफुल मालव्य राजयोग, ‘या’ राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु