-
शेंगदाण्याची अॅलर्जी ही गंभीर समस्या असली तरी योग्य ती काळजी घेतल्यास ती नियंत्रित ठेवता येते. त्या दृष्टीने अन्न निवडताना खबरदारी घेणे, डॉक्टरांचा सल्ला पाळणे आणि अॅलर्जीक पदार्थांचे सेवन न करणे हेच सर्वोत्तम उपाय आहेत. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती शेंगदाण्यातील प्रथिने हानिकारक आहेत, अशी चुकीची समजूत करून घेते. त्यामुळे शरीरात हिस्टामाइनसारखी रसायने तयार होतात आणि त्यातून खाज, सूज, श्वास घेण्यास त्रास अशी अॅलर्जीची लक्षणं दिसतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
संशोधनानुसार, आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे संतुलन बिघडल्यास रोगप्रतिकारक शक्तीचं वर्तन बदलतं. त्यामुळे शरीर काही अन्नपदार्थांना, जसे की शेंगदाणे, परके मानून अॅलर्जीक प्रतिक्रिया दाखवतं. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
कुटुंबात अॅलर्जीची समस्या असल्यास, पुढच्या पिढीमध्येही शेंगदाण्याची अॅलर्जी होण्याची शक्यता वाढते. संशोधन सांगतं की, अॅलर्जीमध्ये अनुवंशशास्त्राचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
अति स्वच्छ वातावरणात वाढल्याने मुलांची रोगप्रतिकारक शक्ती पुरेशी प्रशिक्षित होत नाही. त्यामुळे ती अगदी साध्या पदार्थांवरही तीव्र प्रतिक्रिया देऊ शकते. हीच बाब ‘स्वच्छता गृहीतक’ म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
शेंगदाण्यातील सूक्ष्म अंश इतर पदार्थांमध्ये किंवा भांड्यांमध्ये राहिल्यास, संवेदनशील व्यक्तींमध्ये तीव्र अॅलर्जीक प्रतिक्रिया होऊ शकते. म्हणून प्रक्रिया केलेले अन्न घेताना लेबल नीट वाचणे महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
लहान मुलांना खूप उशिरा शेंगदाणे दिल्यास अॅलर्जीचा धोका वाढतो. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली लवकर शेंगदाणे खायला देण्याची पद्धत सहनशीलता वाढविण्यास मदत करते. येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या… (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…