-
‘झिरो शुगर’, ‘डाएट’ किंवा ‘नो कॅलरी’ म्हणून प्रसिद्ध असलेली सॉफ्ट ड्रिंक्स आरोग्यदायी पर्याय वाटत असली तरी नव्या संशोधनाने धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
ऑस्ट्रेलियातील मोनॅश विद्यापीठाच्या अभ्यासात ३६,००० प्रौढ व्यक्तींचे १४ वर्षांचे निरीक्षण करण्यात आले. या अभ्यासानुसार दररोज एक ‘आर्टिफिशियल स्वीटनर’ असलेले पेय घेतल्यास टाईप-२ डायबेटीसचा धोका ३८ टक्क्यांनी वाढतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
हा धोका साखरयुक्त पेये घेणाऱ्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे संशोधकांनी नमूद केले. साखरयुक्त पेयांमध्ये धोका २३ टक्के इतका होता, तर ‘डाएट’ ड्रिंक घेतल्यास तो ३८ टक्क्यांपर्यंत वाढला. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
अभ्यासातील सर्वांत लक्षवेधी बाब म्हणजे वजन किंवा बॉडी मास इंडेक्स लक्षात घेतल्यानंतरही हा धोका कायम राहिला. म्हणजेच या पेयांमुळे होणारा परिणाम फक्त वजनावर नाही, तर थेट शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर (metabolic system) होत आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
संशोधकांच्या मते, कृत्रिम स्वीटनर शरीरातील ग्लुकोज प्रक्रिया आणि आतड्यातील सूक्ष्मजीव संतुलन (gut microbiome) बिघडवू शकतात. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण होते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
या अभ्यासातून दिसून आले की, ‘साखर टाळल्याने आपण सुरक्षित आहोत’ हा समज चुकीचा ठरू शकतो. ‘झिरो शुगर’ लेबल असलेले पेयेही शरीरावर विपरीत परिणाम करू शकतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
तज्ज्ञांच्या मते, साखरयुक्त आणि कृत्रिम स्वीटनरयुक्त अशा दोन्ही प्रकारची पेये मधुमेहाचा धोका वाढवतात. त्यामुळे पाण्यालाच सर्वोत्तम पर्याय मानावे, असे ते सुचवतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
विशेषतः मुलं आणि किशोरवयीन यांच्यासाठी ‘डाएट ड्रिंक’ ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पालकांनी साखरयुक्त किंवा कृत्रिम स्वीटनर असलेली पेये रोजच्या सवयीचा भाग होऊ देऊ नयेत. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
अभ्यास निरीक्षणाधारित असल्याने थेट कारणसिद्धी दाखवली गेली नाही, मात्र, संशोधकांनी पुढील सखोल संशोधनाची गरज व्यक्त केली आहे. तरीही, ‘डाएट’ ड्रिंक म्हणजे ‘आरोग्यदायी पर्याय’ हा समज मोडीत निघाला आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी दिली आहे. याचा अर्थ वैद्यकीय सल्ला, असा मुळीच नाही. कोणतेही औषध, उपचार किंवा आरोग्यविषयक बदल सुरू करण्यापूर्वी नेहमी पात्र आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती