-
आधुनिक जीवनशैलीत सतत ताण, फास्टफूड आणि औषधांचे सेवन यांमुळे यकृतावर (लिव्हरवर) मोठा ताण येतो. शरीरातील विषारी द्रव्ये फिल्टर करणे, चरबीचे विघटन करणे आणि औषधांचे रासायनिक रूपांतर करणे हे यकृताचे काम असते. पण, अलीकडच्या संशोधनानुसार बीटरूट ज्यूस हे यकृताचं आरोग्य टिकवण्यासाठी एक नैसर्गिक उपाय ठरू शकतो.
-
बीटरूटमधील गुणकारी घटक बीटरूटमध्ये ‘बेटालिन’ नावाचे रंगद्रव्य असते, जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे. हा घटक यकृताच्या पेशींचे संरक्षण करून, सूज कमी करण्यास मदत करतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
चरबीचे संतुलन राखते बीटरूटमध्ये ‘बेटाईन’ नावाचा घटक असतो, जो यकृता धील चरबीचे प्रमाण नियंत्रित ठेवतो. त्यामुळे ‘फॅटी लिव्हर’सारख्या आजाराचा धोका कमी होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
रक्तप्रवाह सुधारतो बीटरूटमधील नैसर्गिक नायट्रेट्स शरीरात ‘नायट्रिक ऑक्साइड’मध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि यकृतातील सूज कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
ज्ञानिक अभ्यास काय सांगतो? १२ आठवड्यांच्या एका अभ्यासात सहभागी लोकांना दररोज २५० मिली बीटरूट ज्यूस दिला गेला. त्यानंतर त्यांच्या यकृतातील एन्झाइम्स (ALT आणि ALP) मध्ये सुधारणा दिसून आली. ही बाब यकृत चांगल्या रीतीनं कार्य करीत असल्याचे संकेत आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत बीटरूट ज्यूस शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करून, यकृताच्या पेशींवरील ताण कमी करतो. त्यामुळे यकृता अधिक कार्यक्षमतेने विषारी घटक बाहेर टाकू शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय? ‘डिटॉक्स’ म्हणजे शरीरातील घाण किंवा विषारी घटक बाहेर टाकणे. हे काम मुख्यतः यकृत आणि मूत्रपिंडे करतात. बीटरूट ज्यूस या प्रक्रियेला चालना देतो आणि त्या अवयवांना अधिक कार्यक्षम बनवतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
सूज आणि पेशींचे नुकसान कमी करते बीटरूटमधील नैसर्गिक द्रव्ये सूज कमी करून, यकृताच्या पेशींचं नुकसान टाळतात. त्यामुळे दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
आरोग्यदायी जीवनशैलीत बीटरूटचा समावेश करा आहारात दररोज एक ग्लास ताज्या बीटरूट ज्यूसचा समावेश केल्याने यकृत मजबूत राहते, पचन सुधारते आणि शरीरातील शुद्धीकरण प्रक्रिया अधिक कार्यक्षम होते. मात्र, हे नैसर्गिक पूरक पेय आहे; परंतु वैद्यकीय उपचारांना पर्याय नाही. (टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. तेव्हा त्याबाबत कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती