-
कढीपत्ता हा आरोग्यास अत्यंत फायदेशीर असून, आपण आहारात त्याचा आवर्जून समावेश करतो. त्याशिवाय कढीपत्ता केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कढीपत्त्याचा वापर केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नाही, तर आयुर्वेदिक आणि घरगुती उपचारांमध्येदेखील केला जात आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जीवनसत्त्वे ए, बी, सी, कॅल्शियम, लोह व अँटिऑक्सिडंट्ससह त्यांचे पोषक घटक त्यांना एक सुपरफूड बनवतात. त्याशिवाय त्यांच्यात दाहकविरोधी, जीवाणूरोधी आणि मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत, जे शरीराला आतून मजबूत करतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अन्नपदार्थांमध्ये आपण कढीपत्त्याचा समावेश करतोच; पण, दररोज उपाशीपोटी कढीपत्त्याची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठीदेखील खूप फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कढीपत्ता नैसर्गिकरीत्या पाचक एंझाइम्स सक्रिय करतात. सकाळी रिकाम्या पोटी ही पाने खाल्ल्याने तुमची पचनसंस्था दिवसभरासाठी तयार होते. त्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता व पोटफुगीपासूनदेखील आराम मिळू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अल्कलॉइड असतात, जे शरीराला आतून स्वच्छ करण्यास आणि अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कढीपत्त्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे केसांच्या आरोग्यावर होणारा परिणाम. कढीपत्त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि प्रथिने टाळूला पोषण देतात, केस गळणे कमी करतात आणि केस पांढरे होण्याचे प्रमाणदेखील कमी करतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कढीपत्त्यातील अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी करतात आणि हृदय मजबूत करतात. कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने हृदयाचे दीर्घकालीन आरोग्य राखण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कढीपत्त्यामध्ये शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची विशेष क्षमता असते. त्यामुळे यकृत आणि रक्त शुद्ध होण्यास हातभार लागतो, ज्यामुळे शरीर हलके आणि उत्साही वाटते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…