-
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार थंड हवामानात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशा वेळी सद्गुरु नैसर्गिक मार्गांनी शरीर सशक्त ठेवण्याचा सल्ला देतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
कडुलिंबाचं महत्त्व सद्गुरुंच्या मते, कडुलिंब हा शरीर शुद्धीसाठी आणि पचन सुधारण्यासाठी उत्तम उपाय आहे. थोडेसे कडुलिंब रोज घेतल्यास शरीरातील जंतू नष्ट होतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
कडुलिंबाचे आरोग्यदायी फायदे कडुलिंब रक्त शुद्ध करते, लिव्हर सुस्थितीत ठेवते आणि शरीरातील नैसर्गिक इम्युनिटी वाढवते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
हळदीतील कर्क्युमिन घटक हळदीतील ‘कर्क्युमिन’ हा घटक दाह कमी करतो, सांध्यातील वेदना कमी करण्यास मदत करतो आणि शरीराला ऊर्जा देतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
हळदीचा सुवर्ण स्पर्श हळद हे प्रत्येक घरातील नैसर्गिक औषध आहे. सद्गुरु सांगतात की, हळद शरीरातील सूज कमी करते आणि रक्तशुद्धी करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
तांब्याचं पाणी फायदेशीर का? सद्गुरुंच्या मते, पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवून प्यायल्यास त्यातील सूक्ष्म जंतू नष्ट होतात आणि पचन सुधारते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
तांब्यातील पाणी आरोग्य टिकवते तांबे हे नैसर्गिक जंतुनाशक आहे. तांब्यातील पाणी नियमित प्यायल्याने लिव्हर चांगलं कार्य करतं आणि शरीरातील ऊर्जा वाढते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
सद्गुरुंचा निष्कर्ष कडुलिंब, हळद आणि तांब्याचं पाणी ही औषधं नाहीत, तर जीवनशैलीचा भाग आहेत. हे तीन उपाय दैनंदिन जीवनात घेतल्यास शरीर निरोगी आणि मजबूत राहतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
(टीप: येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…