-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन, नक्षत्र पद गोचर करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
-
ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. -
पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजून २२ मिनिटांनी अनुराधा नक्षत्राच्या तृतीय पदामध्ये गोचर करणार आहे.
-
शुक्राचे हे नक्षत्र पद गोचर दत्त जयंतीच्या दिवशी असेल या योगायोग १२ पैकी काही राशींसाठी लाभदायी सिद्ध होईल.
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी देखील शुक्राचे नक्षत्र गोचर खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल.
-
मकर राशीसाठी देखील शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप सकारात्मक ठरेल. या काळात तुमचे नशीब बदलेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल.
-
कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचे नक्षत्र पद गोचर खूप फायदेशीर ठरेल. हे गोचर तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करेल. भाग्याची साथ मिळेल. आध्यत्मिक कामात रस वाढेल. व्यवसायात नवीन काही तरी करण्याची इच्छा असल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
युती धर्माला तिलांजली! भाजपच्या प्रवेशांवरून सेना भडकली; एकनाथ शिंदे यांना संयम सोडण्याचे आर्जव…