-
जास्वंदाची फुलं फक्त बागेची शोभा नाही, तर केसांसाठीही अमृतासारखी आहेत. सुक्या जास्वंदांच्या फुलांमुळे केस दाट, मजबूत आणि चमकदार होतात.
-
केसांच्या वाढीसाठी एक कप नारळ तेलात काही सुक्या जास्वंदाची फुले वाटून पेस्ट तयार करा. आठवड्यातून तीनदा केसांवर लावा — केसांची वाढ जलद होते.
-
नैसर्गिक शॅम्पू म्हणून जास्वंद पावडर, बेसन आणि पाणी मिसळा. हे मिश्रण केसांवर लावा आणि कोमट पाण्याने धुवा. केस मऊ आणि स्वच्छ राहतील.
-
डीप कंडिशनिंगसाठी सुक्या जास्वंद फुलांची पेस्ट बनवून केसांवर लावा. काही वेळ ठेवा आणि धुवा. केस रेशमी व चमकदार दिसतील.
-
कोंडा कमी करण्यासाठी जास्वंद पावडर, मेहंदीची पानं, आलोवेरा जेल आणि लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट आठवड्यातून दोनदा लावा. कोंडा आणि खाज दोन्ही कमी होतील.
-
का वापरावी सुकी जास्वंदाची फुले) यात भरपूर व्हिटॅमिन C, ॲमिनो ॲसिड्स आणि ॲंटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक केसांना पोषण देतात, मुळे मजबूत करतात आणि नैसर्गिक चमक आणतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक)
Delhi Red Fort Blast Reddit Post: दिल्ली स्फोटाची शंका ३ तास आधीच १२वीच्या विद्यार्थ्याने व्यक्त केली होती? पोस्टमध्ये म्हणाला होता, “काहीतरी घडतंय का?”