-
सर्वोत्तम गृहिणी किंवा शेफही कधी ना कधी चुका करतात — कधी मीठ जास्त, कधी गोडपणा जास्त, तर कधी पास्ता थोडा जास्त शिजलेला. पण काळजी करू नका — या तज्ज्ञ-approved टिप्स तुमचं जेवण पुन्हा परफेक्ट करतील! . शेफ मोमिना झका यांच्या मते, “बहुतेक स्वयंपाकातील चुका सहज दुरुस्त करता येतात.” कसं ते जाणून घ्या!
(छायाचित्र: इंस्टाग्राम/मोमिना झका) -
जेव्हा पदार्थ ‘खूप गोड’ झाला असेल:
त्यात थोडा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घाला. आम्लीय चव गोडपणा कमी करते आणि फ्लेवर्समध्ये उत्तम समतोल आणते.
(छायाचित्र: Freepik) -
जेव्हा पदार्थ ‘खूप तिखट’ झाला असेल:
थोडं दही, क्रीम किंवा नारळाचं दूध घाला. हे घटक तिखटपणा कमी करून पदार्थाला मऊ आणि क्रीमी बनवतात.
(छायाचित्र: Freepik) -
जेव्हा पदार्थात ‘खूप लसूण’ झाला असेल:
थोडं दही, लिंबाचा रस किंवा थोडा स्टार्च (जसं की उकडलेलं बटाट्याचं कुस्करलेलं मिश्रण) घाला. हे घटक लसणीची तीव्र चव शोषून घेतात आणि पदार्थाची चव संतुलित करतात.
(छायाचित्र: Freepik) -
जेव्हा पदार्थ ‘खूप खारट’ झाला असेल:
एका सोललेल्या बटाट्याचा तुकडा पदार्थात टाका आणि थोडा वेळ उकळू द्या. बटाटा काही प्रमाणात मीठ शोषून घेतो आणि चव कमी करतो.
(छायाचित्र: Freepik) -
जेव्हा भात ‘खूप चिकट’ झाला असेल:
भात एका ट्रेमध्ये पसरवा आणि थोडा वेळ ओव्हनमध्ये ठेवा. त्यामुळे अतिरिक्त ओलावा निघून जातो. किंवा तोच भात फ्राईड राईससाठी वापरा – चव आणि टेक्स्चर दोन्ही सुधारतील! -
जेव्हा पास्ता ‘जास्त शिजला’ असेल:
थोडं ऑलिव्ह ऑईल किंवा बटर टाकून गरम पॅनमध्ये तो परतून घ्या. त्यामुळे पास्ताचा टेक्स्चर पुन्हा सुधारतो, त्याला हलकीशी कुरकुरीपणा येतो आणि चवही वाढते.
(छायाचित्र: Freepik) -
जेव्हा ‘वापरलेलं तेल’ स्वच्छ करायचं असेल:
त्या तेलात थोडं कॉर्नस्टार्च घाला, हलकं गरम करा आणि गाळून घ्या. कॉर्नस्टार्च अन्नाचे तुकडे आणि अशुद्धता शोषून घेतं, ज्यामुळे तेल स्वच्छ आणि पुन्हा वापरण्यास योग्य राहतं.
(छायाचित्र: Freepik)
५०० वर्षानंतर शनीदेव अन् गुरू देणार पैसाच पैसा! २०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींना दुपटीने मिळणार धन-संपत्ती; अखेर श्रीमंतीचे दिवस सुरू…