-
काही जणांचे भात खाल्ल्याशिवाय तर अनेक जणांचे पोळी खाल्ल्याशिवाय जेवण अपूर्ण राहते. पोळी हा भारतीय पाककृतींचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. कारण – पोळी आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. पोळी हा कार्बोहायड्रेट्सचा एक प्रमुख स्रोत आहे; जो शरीराला ऊर्जा प्रदान करतो, चयापचय वाढवतो. फक्त पोषण देत नाही तर आपली पचनशक्ती देखील व्यवस्थित राखण्यास मदत करतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, आपण आहारात शक्यतो गव्हाच्या पोळीचा समावेश करतो. गव्हाची पोळी खाल्ल्याने शरीराला फक्त फायबर मिळते. दररोज जास्त प्रमाणात गव्हाच्या पिठाची पोळी खाल्ल्याने मधुमेह आणि लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे योग्य पिठाची पोळी किंवा भाकरी खाल्ल्याने दीर्घकाळ निरोगी शरीर आणि तंदुरुस्ती राखण्यास मदत होते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ डॉक्टर सलीम झैदी म्हणतात की, गव्हाच्या पोळ्यांव्यतिरिक्त बाजरी, ज्वारी, नाचणी, बेसन आणि ओट्सपासून बनवलेल्या पोळ्या खा. या निरोगी धान्यांपासून बनवलेल्या पोळ्या शरीराला मजबूत आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
ज्वारी – ज्वारीची पोळी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यात फायबर, प्रथिने, आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणात असतात; जी पचनसंस्था मजबूत करून बद्धकोष्ठतासारख्या समस्याही टाळतात. ज्वारीमधील कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते; ज्यामुळे मधुमेहींना फायदा होतो. ज्वारीची कमी कॅलरीज आणि ग्लूटेन-मुक्त असते, जी वजन नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
मका – मक्याची भाकरी स्वादिष्ट आणि पौष्टिकतेने समृद्ध असते. त्यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनसंस्था मजबूत होते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासही मदत होते. मक्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो; जो रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो. वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील हा एक फायदेशीर पर्याय ठरतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नाचणी – नाचणीच्या भाकरीमध्ये कॅल्शियम, फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. यामुळे हाडे मजबूत होतात, रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि पचनसंस्था सुधारते. नाचणीची भाकरी खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य आणि वजन व्यवस्थापनास मदत होते. त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात; जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि तुम्हाला जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
बाजरी – बाजरी ग्लूटेन-मुक्त आणि फायबरने समृद्ध असते; ज्यामुळे पचन सुधारते, पोट भरते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. बाजरीची भाकरी किंवा पोळी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा शरीराला देते. त्यात लोह आणि खनिजे असतात; जे रक्त आणि स्नायूंचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बेसन – बेसनाची पोळी प्रथिने आणि लोहाचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. जे स्नायू तयार करण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. बेसनाची पोळी पचण्यास हलकी असते आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा शरीराला देते. यामुळे वजन नियंत्रित राहते, हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
Bihar Exit Poll 2025 : बिहारमध्ये ‘एक्झिट पोल’चा कौल NDAला, तर महाआघाडी पिछाडीवर! प्रशांत किशोर फॅक्टर जबाबदार?