-
पायात सूज आली तर ?
द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कामाचा ताण, दिवसभर उभं राहणं किंवा जास्त चालणं या कारणांमुळे संध्याकाळी पाय सुजणे सामान्य आहे. पण हीच सूज वारंवार दिसू लागली, चप्पल तंग वाटू लागली किंवा मोज्यांच्या खोल खुणा दिसू लागल्या तर ते दुर्लक्षित करू नये. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
तात्पुरती सूज VS धोक्याची सूज
दीर्घकाळ बसून राहणे, उभे राहणे किंवा मीठ जास्त खाल्ल्यानेही सूज येऊ शकते. मात्र, सूज दोन्ही पायांमध्ये कायम राहू लागली, त्वचा ताणलेली वाटू लागली आणि बोटाने दाबल्यावर खळ दिसली तर हा शरीराचा ‘अलर्ट सिग्नल’ मानला जातो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
हार्ट फेल्युअरची पहिली लक्षणे पायात
हृदयाचे व्यवस्थित पंपिंग न झाल्यास रक्ताच्या गुठळ्या होऊन पायावर सूज दिसू लागते श्वास घेण्यास त्रास, पटकन दम लागणे किंवा वजन वेगाने वाढणे ही लक्षणे दिसली तर तातडीने तपासणी करणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
यकृताच्या आजारातही पाय सुजतात
सिरॉसिससारख्या यकृताच्या समस्येमुळे शरीरात ‘अल्ब्यूमिन’ प्रोटिन कमी बनते, ज्यामुळे द्रव बाहेर झिरपू लागतो. पायासह पोटातही सूज दिसते. त्वचा-पांढरी किंवा डोळे-पिवळे दिसणे ही इशारे देणारी लक्षणे आहेत. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
एका पायात अचानक सूज
रक्ताच्या गाठीचा इशारा एका पायातच सूज, उष्णता, लालसरपणा आणि वेदना दिसली तर ते ‘डीप वेन थ्रॉम्बोसिस’चे (DVT) लक्षण असू शकते. ही रक्तगाठ सुटून फुप्फुसात गेल्यास जीवाला धोका असू शकतो, म्हणूनच अशी सूज दिसताच त्वरित डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
सूज कधी ‘सीरियस’ मानावी?
जर सूजेसोबत श्वास लागणे, छातीत जडपणा, अचानक वजन वाढणे, त्वचा पिवळी होणे किंवा फक्त एका पायात तीव्र सूज दिसली तर ही गंभीर लक्षणे असून विलंब न करता वैद्यकीय मदत घ्यावी. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
घरच्या घरी घ्या काळजी
पाय उंचावर ठेवणे, जास्त वेळ एकाच स्थितीत न बसणे किंवा उभे न राहणे, मीठ कमी खाणे, नियमित चालणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि कॉम्प्रेशन सॉक्स वापरणे—ही काही साधी पण प्रभावी पावले आहेत. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पायांच्या रक्तपुरवठ्याची समस्या
PAD पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) मध्ये रक्तपुरवठा कमी झाल्याने पाय थंड पडणे, जखमा लवकर न भरणे, सुन्नपणा किंवा रंग बदलणे अशी लक्षणे दिसतात. वेळेवर उपचार न केल्यास संसर्ग किंवा ऊतकांचे नुकसान होऊ शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
का लक्ष द्यावे?
दिसायला साधी वाटणारी पायांची सूज कधी कधी हृदय, यकृत, मूत्रपिंड किंवा रक्तवाहिन्यांवरील गंभीर समस्यांची सुरुवात असू शकते. योग्य वेळी ओळखल्यास मोठ्या गुंतागुंती टाळता येतात आणि उपचार सुरू करण्यास फायदा होतो. (टीप: येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
Saudi Arabia Bus Accident : सौदी अरबमध्ये मोठा अपघात, हज यात्रेसाठी गेलेल्या ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू