-
दिवाळी सण अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. भारतभर उत्साहाने हा सण साजरा करण्यात येतो. दीपावली या सणाला सांस्कृतिक, आध्यात्मिक स्थान आहे. भारतभर साजरा केल्या जाणाऱ्या या सणाची पहा झलक
-
पाटण्यात दिवाळी सणासाठी कुंभार मातीचे दिवे तयार करतात. (पीटीआय फोटो)
-
मुंबईत लोक दिवाळी सणाच्या खरेदीसाठी दादरच्या बाजारपेठेत येतात. (पीटीआय फोटो)
-
जम्मू येथील एका भागामध्ये दिवाळी सणासाठी कामगार मेणबत्त्या बनवण्याचे काम करत आहेत. (पीटीआय फोटो)
-
बॉलीवूड गायक सुखविंदर सिंग यांनी नागपुरात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात सादरीकरण केले. (पीटीआय फोटो)
-
जम्मू आणि काश्मीरमधील पोलीस चौकीजवळ टिफिन बॉक्समध्ये इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) सापडले. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे
-
नागपुरात एका अनाथाश्रमातील मुले दिवाळी सणापूर्वी त्यांनी स्वतः बनवलेले दिवे मांडत आहेत. (पीटीआय फोटो)
-
वॉल्ट डिस्ने वर्ल्ड रिसॉर्ट, फ्लोरिडा, यूएसए येथे दिवाळी डान्स फेस्ट दरम्यानच क्षणचित्र (पीटीआय फोटो)
-
कराडमध्ये दिवाळी सणापूर्वी विक्रीसाठी झाडू बनवण्याचेही काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. (पीटीआय फोटो)
-
अमृतसरमध्ये दिवाळीपूर्वी सुरक्षा उपाय म्हणून पंजाब पोलीस कर्मचारी रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे सामान तपासत आहेत. (पीटीआय फोटो)
-
मोहम्मद उमर हा कुंभार आपल्या कुटुंबासह श्रीनगरमधील निशात येथे दिवाळीसाठी मातीचे दिवे बनवतो. उमर हा काश्मीर खोऱ्यातील एकमेव कुंभार आहे जो गेल्या दोन वर्षांपासून दिवाळीसाठी मातीचे दिवे बनवतो. (पीटीआय फोटो)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल