-
योगाचार्य दिवंगत बी.के.एस.अय्यंगार यांची आज ९७वी जयंती आहे. गुरुजींनी ‘बाबागिरी’ कधीही केली नाही. अष्टांगयोगाचे आजच्या काळाला साजेल असे पुनरुत्थान त्यांनी केले आणि लाखो लोकांना योग मार्गास लावले, रोगमुक्त केले.
-
कर्नाटकातील बेल्लुर या गावात बेल्लुर कृष्णम्माचारी सुंदरराज अय्यंगार यांचा १९१८ साली जन्म झाला.
-
अय्यंगार यांचे मेहुणे श्रीमान तिरमलाय कृष्णम्माचार्य हे योगशिक्षक होते. त्यांच्याबरोबर ते म्हैसूरला गेले व योगविद्या शिकले. नंतर त्यांनी अय्यंगार यांना पुण्याला पाठवले. नंतर त्यांनी पुण्यात रमामणी अय्यंगार स्मृती योग संस्था सुरू केली. १९६६ मध्ये त्यांनी ‘लाइट ऑन योग’ हे पहिले पुस्तक लिहिले व ते १८ भाषांत भाषांतरित झाले तेव्हापासून अय्यंगार यांची देश-विदेशातील लोकांना ओळख झाली.
-
आई शेषम्मा यांना गर्भवती असतानाच इन्फ्लुएंझा झाला होता. स्वाभाविकच बाळ जन्मत:च अशक्त होते. इतके की अगदी डॉक्टरांनीही त्यांची आशा सोडली होती. स्वत:च्याच आयुष्याची शाश्वती नसलेले हे बाळ आपली दृढ इच्छाशक्ती, साधना आणि संयम यांच्या बळावर आपल्या उत्तर आयुष्यात जगभरातील अनेकांना रोगांवर केवळ योगसाधनेद्वारे मात करायला शिकवू लागले. आणि या त्यांच्या कार्याने इतके व्यापक रूप धारण केले, की आता ऑक्सफर्ड शब्दकोषात ‘अय्यंगार’ हा शब्द आणि ‘अष्टांग योगपद्धती विकसित करणारी व्यक्ती’ असा त्याचा अर्थ लिहिलेला आपल्याला सापडेल.
-
जगभरात योगपद्धती आणि अय्यंगार ही समानार्थी नावे ठरली, हाच त्यांच्या योगकौशल्याचा पुरावा.
-
आचार्य अय्यंगार यांनी अनेकांवर उपचार केले, अनेक योगशिक्षक घडवले. परदेशात त्यांनी योगशिक्षण देणाऱ्या संस्था काढल्या. पुण्यात त्यांनी महिलांसाठी योगासनांचा स्वतंत्र वर्गही डेक्कन जिमखाना परिसरात सुरू केला होता.
-
ज्येष्ठ तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती व हृदयरोगतज्ज्ञ रुस्तम जाल वकील हेदेखील त्यांचे योगाचे विद्यार्थी. वकील यांच्या पत्नीने अय्यंगार यांची ओळख प्रख्यात व्हायोलिनवादक येहुदी मेन्युहिन यांच्याशी करून दिली. त्यावेळी ते संगीत मफलीसाठी १९५२ मध्ये भारतात आले होते. वेळात वेळ काढून मेन्युहिन अय्यंगारांना पाच मिनिटे भेटले व त्यांना योगात रुची निर्माण झाली. नंतर अय्यंगार व मेन्युहिन यांची मैत्री कायम राहिली. मात्र त्यांच्या या भेटीने अय्यंगार गुरुजींच्या योगप्रसाराच्या कार्यास निराळे आयाम प्राप्त झाले.
-
१९५४ मध्ये मेन्युहिन भारतात आले तेव्हा ते अय्यंगार यांना युरोप व अमेरिकेत योगाचे धडे देण्यासाठी आग्रह करू लागले व आमच्याबरोबर चला असे सांगू लागले. अय्यंगार यांनीही मित्राला नाराज केले नाही. नंतर त्यांनी लंडन, पॅरिस, स्वित्र्झलड असे दौरे करून तेथे योगविद्य्ोचा प्रसार केला. केंद्रे स्थापन केली. ते युरोप दौऱ्यावर गेले. तेथे त्यांनी बेल्जियमची राणी एलिझाबेथ हिला वृद्धापकाळी योगाचे धडे दिले.
सरकारकडून अय्यंगार यांना सर्वप्रथम १९९१ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर २००२ मध्ये ‘पद्मभूषण’, तर २०१४ मध्ये ‘पद्मविभूषण’ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. जून २०११ मध्ये चीनने त्यांच्या नावाने टपाल तिकीट जारी केले. चीनच्या ५७ शहरांत अय्यंगारांचे ३० हजार विद्यार्थी आहेत. २००४ मध्ये ‘टाइम’ नियतकालिकाने त्यांचा गौरव जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये केला होता. एकटय़ा ब्रिटनमध्ये त्यांनी एक हजार योगशिक्षक घडवले आहेत. इतर ४० देशांतही त्यांच्या संस्था काम करीत आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात २०० योगासने व १४ प्रकारचे प्राणायाम शोधले. कव्र्हेचर बेंचसारखी काही लाकडी साधने, ब्लँकेट व खुच्र्या तयार केल्या, त्यामुळे योगासने सुलभ व अचूक झाली.

हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या