-
नाटय़संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा फय्याज शेख यांनी समारंभपूर्वक अध्यक्षपदाची सूत्रे गंगाराम गवाणकर यांच्याकडे सोपवली. यावेळी व्यासपीठावर नाटय़संमेलनाचे उद्घाटक व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. (छायाचित्र : दीपक जोशी)
-
महाराष्ट्र शासनाने विविध बोलीभाषांतील लेखकांना त्यांच्या भाषेतील नाटक लिहायला भाग पाडून बोलीभाषांतील नाटकांच्या स्पर्धेचे आयोजन करावे. त्याचे पालकत्व नाटय़ परिषदेने घ्यावे आणि विजेत्या नाटकांचे सबंध महाराष्ट्रभर प्रयोग करावेत, अशी सूचना ठाणे येथील ९६ व्या नाटय़संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
-
महाराष्ट्राची एक ठळक सांस्कृतिक खूण असलेल्या नाटय़कलेविषयीच्या दस्तावेजांचे एकाच ठिकाणी जतन व्हावे, या हेतूने मुंबईत एक भव्य नाटय़ संग्रहालय उभारण्याचे आश्वासन शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि नाटय़ संमेलनाचे उद्घाटक उद्धव ठाकरे यांनी ९६व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी दिले.
-
नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद हे निव्वळ शोभेचे असून उत्सवातील गणपतीसारखे हे पद औपचारिक आहे.. या पदावरील व्यक्तीला कोणतेही अधिकार नाहीत.. तसेच अतिशय कमी कालावधीचे हे पद आहे.. अशी खंत व्यक्त करत नाटय़संमेलनाध्यक्षांचा कालावधी किमान दोन वर्षांचा तरी असावा, अशी सूचना मावळत्या नाटय़संमेलन अध्यक्षा फय्याज शेख यांनी केली.
-
ठाणे शहरात नाटय़संमेलनाच्या निमित्ताने आठ ठिकाणी अनेक दर्जेदार नाटके, परिसंवाद आणि अभिनयाचे दर्शन घडवणारे कार्यक्रम होत आहेत.
-
नाटय़संगीत आणि बंदिशींचे एकत्रित सादरीकरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांना अनुभवता आला. सारंगवराळी रागामध्ये ‘घेई छंद मकरंद’ हे नाटय़संगीत गाऊन राहूल देशपांडे याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर आनंद भाटे यांनी ‘मियॉं की तोडी’ आणि अभंग गात रसिकांसमोर नाटय़संगीताचा दर्जेदार खजिना खुला केला. याशिवाय नाटय़संगीतातील पदे आणि चित्रपटांमधील नाटय़संगीताचे सादरीकरण करून रसिकांना नाटय़संगीताचा स्वर्गीय आनुभव दिला.
-
राहुल देशपांडे आणि आनंद भाटेंसारख्या दिग्गज कलाकारांनी तरंगत्या रंगमंचावरील पहिल्या सादरीकरणाने ठाणेकरांची मने जिंकली.

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या