-
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे बुधवारी दुपारी भारतात आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर शिंजो अाबे यांचे स्वागत केले. शिंजो आबे यांची गळाभेट घेत मोदींनी त्यांचे स्वागत केले. यानंतर दोन्ही पंतप्रधानांनी रोड शो केला.
-
पंतप्रधान मोदींनी शिंझो आबे यांचे आलिंगन देऊन स्वागत केले.
शिंजो आबे यांच्यासह त्यांची पत्नीदेखील भारतात आली आहे. नरेंद्र मोदी, आबे आणि त्यांच्या पत्नीने विमानतळावरुन साबरमती आश्रमापर्यंत रोड शो केला. -
यावेळी आबे यांचा 'गार्ड ऑफ ऑनर'ने सन्मान करण्यात आला.
मुंबई- अहमदाबाद या देशातील पहिल्या व महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ गुजरातमधून केला जाणार आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे आजपासून (बुधवारी) भारत दौऱ्यावर आले असून या दौऱ्यात ते नरेंद्र मोदी यांच्या समवेत अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. -
मोदी आणि आबे यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती.
-
विमानतळ ते साबरमती आश्रम अशा या रोड शोसाठी आबे यांनी 'मोदी जॅकेट' परिधान केले तर अकी आबे यांनीही भारतीय पेहराव केला होता.
-
गुजरातच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध कलांचे रंगारंग दर्शन यावेळी आबे यांना घडले.
-
जपानच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या या प्रकल्पाची किंमत १.८ लाख कोटी रुपये आहे. हा प्रकल्प ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याशिवाय अन्य दहा सामंजस्य करारांवरही मोदी- आबे भेटीत स्वाक्षऱ्या होतील.
-
आबे यांच्या पत्नीचा भारतीय पेहराव बघून सारेच आश्चर्यचकीत झाले. रस्त्याच्या दुतर्फा स्थानिकांनी गर्दी झाली होती. रोड शोच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
-
सिदी सय्यद मशिदीतील दगडांच्या नक्षीकामाचीही शिंजो आबेंनी भरभरून स्तुती केली.
-
रोड शोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिंजो आबेंसह सिदी सैय्यद मशिदीलाही भेट दिली.
-
भारतात शिंजो आबेंचं जंगी स्वागत
-
शिंजो आबे यांच्यासह त्यांची पत्नीदेखील भारतात आली आहे.
-
-
आपल्या दोन दिवसाच्या दौऱ्यात शिंजो आबे गुजरातमध्येच राहणार आहेत.
-
मोदी आणि आबे यांनी साबरमती आश्रमात जाऊन महात्मा गांधी यांनी आदरांजली अर्पण केली.
-
साबरमती आश्रमात दाखल झाल्यानंतर आबे, त्यांची पत्नी आणि पतंप्रधान मोदी यांनी महात्मा गांधींना पुष्पांजली वाहिली.
-
साबरमती आश्रमातील चरखा, गांधीजींची तीन माकडं याबाबत मोदी यांनी यावेळी आबे यांना माहिती दिली.
-
भारतात शिंजो आबेंचं जंगी स्वागत

सूरजच्या नव्या घराची पहिली झलक! अंकिताने पाहिलं भावाचं ‘ड्रीम होम’, नवीन बंगल्यात करणार बायकोचं स्वागत, पाहा…