-
संग्रहीत
-
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (१७ ते १९ सप्टेंबर २०१४) – मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अहमदाबादमध्ये आलेले पहिले राष्ट्राध्यक्ष हे चीनचे शी जिनपिंग होते.
-
डोनाल्ड रबींद्रनाथ रामोतार- गयानाचे राष्ट्राध्यक्ष (तत्कालीन) (७ ते १२ जानेवारी २०१५) – शी जिनपिंग यांच्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी गयानाच्या राष्ट्राध्यक्षांनी अहमदाबाला भेट दिली.
-
शेरिंग तोबगे – भूतानचे पंतप्रधान (तत्कालीन) (१० ते १८ जानेवारी २०१५) – गयानाचे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादमध्ये असतानाचा भूतानेचे पंतप्रधान शेरिंग तोबगेही अहमदाबादमध्ये होते.
-
फिलिप जेसिंटो न्यूसी – मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष (४ ते ८ ऑगस्ट २०१५) – २०१५ साली अहमदाबादच्या दौऱ्यावर आलेल्या तिसऱ्या मोठ्या परदेशी नेत्याचे नाव होते फिलिप जेसिंटो न्यूसी. न्यूसी हे मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष आहेत.
-
शिंजो आबे- जपानचे पंतप्रधान – (११ ते १३ डिसेंबर २०१५) – वर्ष संपण्याच्या दोन आठवडे आधी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी अहमदाबादला भेट दिली.
-
के.पी. शर्मा ओली – नेपाळचे पंतप्रधान (१९ ते २४ फेब्रुवारी २०१६) – २०१६ साली फेब्रुवारी महिन्यात नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली अहमदाबादमध्ये आले होते.
-
अॅंटोनियो कोस्टा – पोर्तुगालचे पंतप्रधान (७ ते १३ जानेवारी २०१७) – त्यानंतर थेट ११ महिन्यांनी म्हणजे जानेवारी २०१७ साली परदेशी नेता अहमदाबादमध्ये दाखल झाला. या नेत्याचे नाव होते अँटोनियो कोस्टा. कोस्टा हे पोर्तुगालचे पंतप्रधान आहेत.
-
अलेक्झांडर वुकिक – सर्बियाचे पंतप्रधान (तत्कालीन सध्या वुकिक सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत) (९ ते १२ जानेवारी २०१७) – सर्बियाचे पंतप्रधान वुकिक यांनी पोर्तुगालचे पंतप्रधान अहमदाबाद दौऱ्यावर असतनाच अहमदाबादमध्ये दाखल झाले होते.
-
विद्या देवी भंडारी – नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा (१७ ते २१ एप्रिल २०१७) – नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्या देवी भंडारी यांनी एप्रिल महिन्यात अहमदाबादचा दौरा केला होता.
-
शिंजो आबे- जपानचे पंतप्रधान (१३ आणि १४ सप्टेंबर २०१७) २०१५ नंतर दोन वर्षांनी म्हणजे २०१७ साली शिंजो आबे दुसऱ्यांदा अहमदाबाद दौऱ्यावर आले होते.
-
बिन्यामिन नेतान्याहू – इस्रायलचे पंतप्रधान (१४ ते १९ जानेवारी २०१८) आपल्या भारत दौऱ्यामध्ये आग्र्यानंतर नेतान्याहू अहमदाबादमध्ये दाखल झाले होते.
-
जस्टिन ट्रुडो – कॅनडाचे पंतप्रधान (१७ ते २४ जानेवारी २०१८) ट्रुडो त्यांच्या संपूर्ण कुटुंबासहित अहमदाबादमध्ये आले होते.
-
इमॅन्युअल मॅक्रॉन – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (९ ते १२ मार्च २०१८) मॅक्रॉन यांनी भारतातील चार शहरांना भेट दिली. ते गुजरातलाही जाऊन आले.
-
डॉ. फ्रँक वाल्टर स्टाइनमायर – जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष (२२ ते २५ मार्च २०१८) मॅक्रॉन यांच्यानंतर अवघ्या दहा दिवसांनी जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादमध्ये दाखल झाले होते.
-
डॅनी एंटोइन रोलेन – सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष (२२ ते २७ जून २०१८) २०१८ मध्ये अहमदाबादला भेट देणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्ये पाचवे नाव आहे सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॅनी एंटोइन रोलेन यांचे.
-
प्रविंद कुमार जगन्नाथ – मॉरिशसचे पंतप्रधान (२० ते २८ जानेवारी २०१९) २०१९ मध्ये जानेवारी महिन्यात मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ अहमदाबाद दौऱ्यावर आले होते.
-
महिंदा राजपक्षे – श्रीलंकेचे पंतप्रधान (७ ते ११ फेब्रुवारी २०१९) जगन्नाथ यांच्यानंतर अवघ्या आठवड्याभराच्या काळात श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी अहमदाबादला भेट दिली.

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक