-
अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्यानं केंद्राबरोबर राज्यातील सरकारांकडून लोकांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधताना आज (२२ मार्च) जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) पाळण्याचं आवाहन केलं होतं. या कर्फ्यूला पहाटे सुरूवात झाली आहे. मोदींच्या आवहानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात शुकशुकाट दिसत आहे. सकाळपासूनच मुंबई पुण्यासारख्या महानगरांमध्ये रस्ते ओस पडले असून अगदी एक-दोन नागरिक रस्त्यावर दिसत आहेत. पाहूयात मुंबई-पुण्यातील काही फोटो… (फोटो: मुंबई- निर्मल हरिंद्रन, पुणे- सागर कासार) शुकशुकाट
-
पुण्यातील रस्ते अशाप्रकारे ओस पडल्याचे चित्र दिसत आहे.
-
हे चित्र आहे पुण्यातील स्वारगेट बस डेपोमधील
-
पुण्यातील स्वागरगेट स्थानकात प्रवासीच नाहीत.
-
पुण्यामधील स्वारगेट स्थानकाचे आणखीन एक दृष्य
-
सामान्यपणे लांबच लांब रांगा असणारी बुकींग काऊंटर अशी ओस पडली आहेत.
-
मुंबईतील मलबार हिलमधील केंप कॉर्नरचे हे सकाळचे दृष्य
-
केंप कॉर्नर (मुंबई) येथे सामान्यपणे यावेळेस टॅक्सी आणि खासगी वाहनांची गर्दी असते. जनता कर्फ्यूमुळे येथेही अगदी शुकशुकाट आहे.
-
मुंबईतील मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या वरळी येथील हाजी अली दर्गा परिसरातील हे निर्जन रस्ते.
-
हाजी अली दर्गा परिसरात शुकशुकाट आहे
-
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे खालापूर टोल नाका
-
कायम गर्दी असणारा परिसर म्हणजे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर असा ओस पडला आहे.
-
मुंबई महानगरपालिका आणि सीएसएमटीचा परिसरा असा ओस पडला आहे.
-
रोज सकाळी चाकरमान्यांची गर्दी असणारा हा परिसरा असा निर्मनुष्य झाला आहे.
-
रविवारी येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र जनता कर्फ्यूमुळे आज हा परिसर ओस पडला आहे.
-
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील दृश्य. (फोटो : निर्मल हरिद्रन)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग