-
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे बलात्कार, चोऱ्या आणि हत्यांच्या आरोपाखाली एका माजी पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. दरम्यान, अटकेनंतर त्यानं आपला गुन्हा कबुल केला. त्यानं अनेक बलात्कार, चोऱ्या आणि १३ हत्या केल्या होत्या. त्याला गोल्डन स्टेट किलरचंही नाव देण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य – एपी)
-
दरम्यान अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे जोसेफ जी एंजेलो ज्युनिअर. त्याला २०१८ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. परंतु गेल्या २ वर्षांपासून न्यायालयासमोर काहीही बोलत नव्हता. तसंच अनेकदा विचारणा केल्यानंतरही त्यानं आपला गुन्हा कबुल केला नव्हता. (फोटो सौजन्य – एपी)
-
२९ जून २०२० रोजी त्यानं न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला. आपण मोठी चूक केली असली तरी आपल्याला शिक्षा ठोठावू नये असं त्यानं यावेळी न्यायालयासमोर म्हटलं. परंतु न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच त्याला जामिनावरही सोडण्यात येणार नसल्याचं न्यायालयानं सांगितलं. (फोटो सौजन्य – एपी)
-
७४ वर्षीय जोसेफ यानं दोन वर्षे पोलीस प्रशासनासमोर आपला गुन्हा कबुल केला नाही. परंतु नंतर त्यानं न्यायालयासमोर आपला गुन्हा मान्य केला. (फोटो सौजन्य – एपी)
-
जोसेफ याच्यामुळे १९७०-८० च्या दशकात कॅलिफोर्नियामध्ये भीतीचं वातावरण होतं. अनेक बलात्कार, १३ हत्या आणि अनेक चोऱ्या त्यानं केल्या होत्या. परंतु १९८६ पासून त्यानं असं करणं बंद केलं. अनेक वर्षे तो पोलिसांपासूनही आपला बचाव करत होता. अखेर एप्रिल २०१८ मध्ये त्याला अटक करण्यात आली. (फोटो सौजन्य – एपी)
-
आपल्या शरीरात जेरी नावाची एक व्यक्ती असून त्यानं आपल्याकडून हे गुन्हे करवून घेतले. तो आपल्याला नियंत्रित करत असल्याचा अजब दावा त्यानं न्यायालयात केला. (फोटो सौजन्य – एपी)
-
या प्रकरणी सॅक्रोमेंटो स्टेट युनिव्हर्सिटीच्या हॉलमध्ये सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान जवळपास १५० जण उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत ही सुनावणी घेण्यात आली. (फोटो सौजन्य – एपी)
-
सुनावणीदरम्यान, न्यायालयात पीडितांचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. जेव्हा जोसेफनं आपला गुन्हा कबुल केला तेव्हा सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोसेफ हा माजी सैनिकही होता. त्यानं व्हिएतनामविरोधातील युद्धात भाग घेतला होता. (फोटो सौजन्य – एपी)
-
सुनावणीदरम्यान, न्यायालयात पीडितांचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. जेव्हा जोसेफनं आपला गुन्हा कबुल केला तेव्हा सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोसेफ हा माजी सैनिकही होता. त्यानं व्हिएतनामविरोधातील युद्धात भाग घेतला होता. (फोटो सौजन्य – एपी) याव्यतिरिक्त त्याला पोलिसांच्या तपासाची माहिती असल्यानं तो अनेक वर्षे पकडला गेला नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. (फोटो सौजन्य – एपी)
-
पोलिसांनी अनेक वर्षे त्याच्याविरोधात पुरावे गोळा केले. तसंच डीएनए चाचणीही करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. (फोटो सौजन्य – एपी)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक