-    कोकण विभागातील बहुतांश भागात पुढील तीन ते चार दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार आहे. राज्याच्या उर्वरित भागांत पाऊस ओसरणार असून, पुढील काही दिवस तो विश्रांती घेईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. (सर्व फोटो: प्रदीप दास) 
-    मुंबईमध्ये काल पावसाने विश्रांती घेतली. मुंबईच्या समुद्रामध्ये काल ४.६७ मीटरपर्यंतच्या उंच भरतीच्या लाटा उसळल्या. 
-    गेट वे ऑफ इंडिया परिसरामध्ये उंच उंच लाटा अशापद्धतीने किनाऱ्याला धडका देत होत्या. 
-    सामान्यपणे या अशा भरतीच्या लाटांमध्ये भिजण्यासाठी मुंबईकर गर्दी करतात. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर काल गेट वे जवळ या लाटांचा आनंद घेण्यासाठी अगदीच तुरळक नागरिक दिसून आले. 
-    समुद्राला अशापद्धतीने उधाण आलं होतं. 
-    समुद्राच्या लाटा अशा पद्धतीने गेट वे जवळच्या कठड्यांना धडकत होत्या. 
-    हा परिसर मात्र निर्मनुष्य होता. 
-    सोमवारी (६ जुलै) विदर्भ आणि मराठवाडय़ातील तुरळक भागात जोरदार पाऊस पडला. गेल्या चोवीस तासांत मुंबई, ठाण्यासह कोकणात अनेक ठिकाणी मोठय़ा पावसाची नोंद झाली. 
-    राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रावरील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे कोकण विभागांतील सर्वच भागांत आणि प्रामुख्याने मुंबई, ठाणे परिसरात अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी चोवीस तासांत २०० ते ३०० मिलिमीटरपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने दिलासा दिला. या भागांत शेतीसाठी उपयुक्त पाऊस झाला आहे. 
-    सध्या गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण विभागांत सर्वच ठिकाणी आणि प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यंमध्ये पाऊस कायम राहणार आहे. 
-    कोकण वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर ओसरत चालला आहे. घाटमाथ्यांवरही पाऊस कमी झाला आहे. ८ ते १० जुलै या कालावधीत उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. 
 
  बाप-लेक भावुक! भारताला विजय मिळवून दिल्यानंतर वडिलांना मिठी मारून ढसाढसा रडली जेमिमा, कुटुंबाला भेटतानाचा क्षण 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  