-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील चुकलेले उड्डाण पूल टाळेबंदीचा मुहूर्त साधत जमीनदोस्त करण्याची कार्यावाही मंगळावरी सकाळी सुरु करण्यात आली. टाळेबंदीमुळे वाहनांची वर्दळ कमी असल्यामुळे पाषाणकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाची पहिली बाजू पाडण्याचे काम सुरु झाले आहे. (सर्व फोटो- अरुल होरायझन)
-
येत्या दहा दिवसांमध्ये उड्डाण पूल पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचे नियोजन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात आलं आहे. उड्डाणपूल पाडून पीएमआरडीएच्या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेसाठी दुहेरी उड्डाण पूल बांधण्याचे नियोजित आहे.
-
पंधरा वर्षांपूर्वी राजकीय अट्टाहासातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्बल ४५ कोटी रुपये खर्च करुन पूल उभारले. मात्र त्यांचे नियोजन फसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे उड्डाण पूल उभारल्यानंतरही पंधरा वर्षे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला होता. या उड्डाण पुलाच्या उभारणीला त्यावेळी कडाडून विरोधही झाला होता. शहराचे तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी उड्डाण पूल नको, अशी भूमिका घेतली होती.
-
वाहतूक क्षेत्राशी संबंधित अनेक तज्ज्ञांनीही उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी संपणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र अझित पवार यांनी हा विरोध मोडून काढत उड्डाण पूल उभारले होते. त्यानंतर पुलाचे बांधकाम सदोष असून त्याची रचनाही चुकल्ये पुढे आले होते. पवार यांनाही त्याची जाहीर कुबुली दिली होती.
-
प्रस्तावित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेला अडथळा ठरत असल्याचे कारण पुढे करुन हे उड्डाण पूल पाडण्यात येत आहेत. वाहतुकीचे प्रमाण, खासगी गाड्यांची संख्या लक्षात घेऊन मेट्रो मार्गिकेचा समावेश अलेला दुहेरी उड्डाण पूल येथे उभारण्यात येणार आहे. टाटा सिमेन्स कंपनीला हे काम देण्यात आलं आहे.
-
गेल्या अनेक दिवसांपासून उड्डाण पूल पाडण्याची चर्चा शहरात सुरु होती. टाळेबंदीच्या कालावधीतच तो पाडण्याचे नियोजन करण्यात आले होते.
-
नवा प्रस्तावित उड्डाण पूल मेट्रोच्या खांबावर असणार आहे. वाहतुकीचा ताण, खासगी वाहनांची वाढती संख्या, सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेऊन दुहेरी उड्डाण पुलाची रचना करण्यात येणार आहे. सध्या त्याचा प्राथमिक आराखडा पीएमआरडीएकडून आला आहे. मात्र त्यामध्येही काही बदल होण्याची शक्यता पीएमआरडीएकडून व्यक्त करण्यात आली आहे.
-
प्रशासकीय पातळीवरील मान्यतेची प्रक्रिया आणि मनुष्यबळ उपलब्ध होताच उड्डाण पूल पाडण्याची प्रक्रिया पीएमआरडीएकडून सुरु करण्यात आली. उड्डाण पूल पाडणे, राडारोडा उचलणे, पर्यायी मार्गांची व्यवस्था करणे अशी कामे पीएमआरडीएकडून केली जाणार आहेत.
-
हे सर्व काम पूर्ण करण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र दहा दिवसांत राडारोडा उचलण्याची कामे करण्यात येतील, असा दावा करण्यात आला आहे. पंधरा दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
-
“या कामामध्ये विविध खात्यांत समन्वय राहावा यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. कामाचा दैनंदिन आढावा घेण्यात येईल. वाहनचालकांसाठी पर्याया रस्त्यांची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरु आहे,” अशी माहिती शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…