-
करोनासंदर्भातील उपाययोजना आणि एकंदर परिस्थितीसंदर्भात नेपाळ सरकारने अधिक गांभीर्याने निर्णय घेणे आणि पावले उचलने गरजेचे असल्याचे सांगत आंदोलन करणाऱ्या ई (Iih) या तरुण समाजसेवकापुढे नेपाळ सरकारला नमतं घ्यावं लागलं आहे. ई ने केलल्या प्रयत्नांची देशातील के. पी. शर्मा ओली सरकारने दखल घेत त्याच्या मागण्या मान्य केल्या आहेत. (फोटो सौजन्य : AP)
-
नेपाळमधील करोनासंदर्भातील परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच दुसरीकडे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली मात्र स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचा आरोप ई ने केला होता. सरकारविरोधात आंदोलनाच्या नेतृत्व करण्याचा निर्णय घेत ई ने पहिल्यांदा १२ दिवस उपोषण करत आपल्या मागण्या रेटण्याचा प्रयत्न केला. तो येथील पटणा दरबार स्वेअरमध्ये पहिल्यांदा उपोषणाला बसला होता. (फोटो सौजन्य : AP)
-
त्यानंतर दुसऱ्यांदा ईने २३ दिवस उपोषण करत सरकारला जागं करण्यासाठी आणि करोनासंदर्भात उपययोजना करण्याची मागणी केली. (फोटो सौजन्य : AP)
-
अनेक आंदोलकांनी देशातील करोनासंदर्भातील धोरणांवर सरकारने काम करावं अशी मागणी करत पंतप्रधान ओली यांच्या घराबाहेरच आंदोलन केलं. (फोटो सौजन्य : AP)
-
२९ वर्षीय ई हा स्कूल ड्रॉप आऊट म्हणजे शिक्षण अर्ध्यातून सोडून दिलेला तरुण आहे. त्याने सोशल नेटवर्किंगवर केलेल्या पोस्टवरुन या आंदोलनाचा जन्म झाला आणि त्याला देशभरातील तरुणांनी पाठिंबा दिला. (फोटो सौजन्य : AP)
-
ई ने सुरु केलल्या आंदोलनामध्ये नेपाळमधील वेगवगेळ्या भागातील तरुणांनी सहभाग नोंदवला आणि रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. अखेर तरुणांच्या या मागण्यापुढे नेपाळ सरकारला झुकावं लागलं आणि त्यांनी ई ने उपोषण सोडावे या मागणीवर त्याच्या अटी मान्य केल्या. या आंदोनलानंतर आता नेपाळ सरकारने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजनांनी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्य : AP)
-
अनेक ठिकाणी तरुणांनी अशाप्रकारे फुटपाथवर झोपून आंदोलन केलं. मात्र या आंदोलनादरम्यान त्यांनी मास्कचा वापर केल्याचे पाहायला मिळालं. (फोटो सौजन्य : AP)
-
ई ने सुरु केलेल्या या मोहिमेला ३ कोटींपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या नेपाळमध्ये तुफान प्रितिसाद मिळाला. (फोटो सौजन्य : AP)
-
ई च्या समर्थनार्थ म्हणजेच देशातील करोनासंदर्भातील उपाययोजनांबद्दल सरकारने अधिक काळजी घेण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्जही केला. (फोटो सौजन्य : AP)
-
पोलिसांनी तरुण आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याबरोबरच पाण्याचा मारा केला, अनेकांना अटक केली. मात्र ई ने आंदोलन मागे घेतलं नाही. (फोटो सौजन्य : AP)
-
करोनासंदर्भातील आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांमध्ये २९ वर्षीय चित्रपट निर्माता रॉबिक उपाध्यायचाही समावेश होता. त्याने सोशल नेटवर्किंगवर इनफ इज इनफ म्हणजे बास आता पुरे झाले नावाचे आंदोलन सुरु करत ई ला पाठिंबा दिला. (फोटो सौजन्य : AP)
-
या आंदोलनाची ठिणगी ज्या पोस्टमधून पडली त्या ई ने लिहिलेल्या पोस्टमध्ये करोनासंदर्भातील सरकारी उपाययोजनांवर आपण प्रश्न विचारले पाहिजेत. आंदोलन केलं पाहिजे असं म्हटलं होतं. (फोटो सौजन्य : AP)
-
ई च्या या पोस्टला पाठिंबा देत ४०० आंदोलनकर्ते गोळा झाले होते. यानंतर पोलिसांनी ई ला ताब्यात घेतलं. यापूर्वी ई ने अल्पसंख्यांकांसाठीही आंदोलन केलं आहे. (फोटो सौजन्य : Reuters)
-
खेर ई च्या आंदोलनासमोर ओली सरकारने चर्चेच्या माध्यमातून उत्तर शोधण्याचा निर्णय घेत त्याच्याबरोबर एक करार केला. (फोटो सौजन्य : AP)
-
नेपाळ सरकारने ई बरोबर केलेल्या या करारामध्ये करोनासंदर्भातील देशातील चाचण्या अधिक सक्षम केल्या जातील असं सरकारने सांगितलं. त्यानंतर ई ने आपलं उपोषण मागे घेतलं. (फोटो सौजन्य : AP)

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”