-
कृषी कायद्यांविरोधात गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असून आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. (Express Photos: Pavan Khengre)
-
सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद करण्यात आला.
-
महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी शांततेत बंद पाळण्यात आला.
-
पुण्यात ठिकठिकाणी आंदोलन करत भारत बंदला पाठिंबा दर्शवण्यात आला.
-
-
स्वारगेटमध्ये बंदोबस्तासाठी तैनात असणारे पोलीस
-
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वारगेटमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
-
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डही भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी बंद ठेवण्यात आलं होतं.
-
शेतकरी संघटनांनी जाहीर केलेल्या देशव्यापी बंदला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पाठिंबा जाहीर केला होता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीही यात सहभागी झाली होती. माथाडी, व्यापारी शंभर टक्के झाले.
-
अलका चौक ते मंडई दरम्यान मोर्चा काढला जाणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने, अलका चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
-
अलका चौकात शीख बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.
-
"अगर देश बचाना है, तो मोदी को हटाना है", अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
-
अलका चौकातील आंदोलनात लहान मुलंदेखील सहभागी झाली होती.
-
"ना धर्म दा, ना सायन्स दा, मोदी है रिलायन्स दा," असं पोस्टरवर लिहिलेलं यावेळी दिसत आहे.
-
लक्ष्मी रोडवरील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती.
-
यामुळे तेथील रस्त्यांवर पूर्णपणे शुकशुकाट झाला होता.
-
पुण्यातील मार्केटयार्ड मध्ये असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ पाहण्यास मिळते. मात्र मार्केटयार्डमध्ये दररोज 900 ट्रक गाड्यांची आवक होत असते. मात्र आज केवळ 175 ट्रक मधून फळभाज्यांची आवक झाली आहे. यातील बहुतांश ट्रक हे परराज्यातून आलेले आहेत.
-
पिंपरी-चिंचवड शहरातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेत काही प्रमाणात दुकाने बंद होती, तर इतर ठिकाणी दुकाने सुरू असल्याचं चित्र होतं.
-

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक