-
राज्यात सोमवारी ३,३६५ करोनाबाधित आढळले. साधारणपणे सोमवारी रुग्णसंख्या कमी आढळते. मात्र, जवळपास अडीच महिन्यानंतर सोमवारी (१५ फेब्रुवारी) रुग्णसंख्या साडेतीन हजारांच्या घरात पोहोचली. रविवारी सुट्टी असल्याने चाचण्या कमी होतात. त्यामुळे सोमवारी रुग्णांची संख्या इतर दिवसांपेक्षा कमी आढळते. गेल्या काही महिन्यांपासून असाच कल आढळतो. (सर्व फोटो – संग्रहित)
-
राज्यात ३० नोव्हेंबरला (सोमवार) ३८०० नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्णसंख्येत सातत्याने घसरण होत जानेवारीच्या शेवटच्या सोमवारी ती १८४२ नोंदविण्यात आली. परंतु, फेब्रुवारीमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याचे आढळते. गेल्या सोमवारी रुग्णांची संख्या २२१६ नोंदविण्यात आली असून, या सोमवारी तर रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा पार केला. अमरावती, वर्धा तसेच मुंबईमध्येही करोना रुग्ण वाढत आहेत.
-
रुग्णसंख्या वाढू लागल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागील कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य आहे.
-
"राज्यातील करोनाची रुग्णसंख्या वाढत असून, मुखपट्टी वापरण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. अशीच स्थिती राहिली तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कठोर निर्णय घ्यावे लागतील," असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. एका शासकीय बैठकीनंतर अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
-
त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध आणण्यासंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे.
-
येत्या काळात राजकीय सभांमध्ये होणाऱ्या गर्दीवरही निर्बंध ठेवण्यासाठी आचारसंहितेची गरज असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊ असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
-
संग्रहीत
-
मुंबईतील उपनगरी रेल्वे सर्वासाठी खुली केल्यानंतर तिथे रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
-
त्यामुळे मुंबई लोकलच्या बाबतीतही मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
२२ फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्या आणि परिस्थिती लक्षात घेऊन लोकलसंबंधी निर्णय घेतला जाईल असं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं आहे.
-
संग्रहीत
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…