-
पुणे शहराच्या चारही बाजूंना ५० किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिकेचे काम अगदी वेगाने सुरु आहे. या मार्गांपैकी एका मार्गावर ऑगस्ट महिन्यापर्यंत आणि पाच टप्प्यांमध्ये डिसेंबरपर्यंत मेट्रो धावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच पुणे मेट्रोच्या डब्ब्यांची पहिली झकल नुकतीच पहायला मिळाली आहे. (फोटो : अरुल होरायझन/ इंडियन एक्सप्रेस)
-
वनाज येथील मेट्रोच्या यार्डामध्ये पुणे मेट्रोचे सहा डब्बे दाखल झाले आहेत. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर मार्च महिन्यात मेट्रोची चाचणी सुरू होणार आहे.
-
पुर्णपणे प्लास्टिकच्या आवरणामध्ये असलेल्या या डब्ब्यांची रंगसंगती खूपच आकर्षक आहे.
-
मेट्रोच्या या गाड्यांचा पुढील भाग हा पांढऱ्या रंगाचा असून मेट्रोचे डब्बे करड्या (ग्रे) रंगाचे आहेत.
-
ग्रे रंगाच्या डब्ब्यांवर पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असल्याचेही दिसून येत आहे.
-
मार्च महिन्यातील पुढील काही आठवड्यांमध्ये मेट्रोची चाचणी अपेक्षित असल्याने त्याच पार्श्वभूमीवर हे डब्बे येथील यार्डामध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…