-
पुण्यामध्ये करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मास्क न घालणाऱ्यांविरोधात पोलिसांनी काठोर कारवाई करण्यास सुरुवात केलीय. (सर्व फोटो > पवन खेंगरे. एक्सप्रेस फोटो)
-
पुणे पोलिसांनी शहरातील मार्केट यार्ड परिसराबरोबरच जागोजागी नाकाबंदी करुन अशापद्धतीने विशेष नाकाबंदी करत मार्क न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली.
-
अनेक ठिकाणी चारचाकी वाहनांमधील व्यक्तींनाही मास्क घातले आहे की नाही हे सुद्धा तपासून पाहिले जात होते.
-
चार चाकी वाहनांमध्येही एकाच कुटुंबातील लोकं प्रवास करत नसतील तर मास्क घालणे बंधनाकारक आहे.
-
गाडी चालवणाऱ्याबरोबरच गाडीवर मागे बसलेल्या व्यक्तीने मास्क घालता नसेल तरी पोलीस कारवाई करत होते. पालक मंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या करोना आढावा बैठकीमध्ये मास्क न घालणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात कारवाई करण्यास मंजुरी देण्यात आल्यानंतर शहरात कारवाईला सुरुवात झाली.
-
शहरातील अनेक रस्त्यांवर पोलीसांच्या तुकड्या मास्क न घालणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या.
-
पोलिसांनी मास्क न घालेल्यांना आडवण्यासाठी अशाप्रकारे थेट रस्त्याच्या मधोमध उभं राहून गाड्या थांबवल्या.
-
काहीजण या आजोबांप्रमाणे मास्क न घातल्यामुळे कारवाई केल्यानंतर अगदी हात जोडून माफी मागताना दिसले.
-
अनेकांनी करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली.
-
तर काहींना थेट पोलिसी खाक्या दाखवत मास्क घालण्यासंदर्भातील इशारा द्यावा लागला.
-
पुण्यामधील वाढत्या करोना परिस्थितीचा आढावा काल पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यानंतर शहरामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी मास्क न घालणाऱ्यांविरोधात कारवाई केली.

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल