-
सरकारच्या एका पॅनलने करोनावर मात केलेल्या व्यक्तींना नऊ महिन्यांनंतर करोनाची लस देण्याचा सल्ला दिलाय. लसीकरणासंदर्भातील अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) या पॅनेलने हा सल्ला दिला आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक, पीटीआयवरुन साभार)
-
एनटीएजीआयने यापूर्वीच कोविशिल्डच्या दोन डोसांमधील अंतर वाढवण्यास सांगितलं आहे. आधी या दोन डोसांमधील अंतर चार ते आठ आठवडे इतकं होतं.
-
तज्ज्ञ मंडळींचा समावेश असणाऱ्या या पॅनलने दोन डोसांमधील अंतर किती असावं यासंदर्भात राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती तपासून पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांदा संसर्ग होऊ नये म्हणून दोन डोसमधील अंतर वाढवण्यात यावं असं म्हटल्याचं समजतं.
-
इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्याने करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना करोनामुक्तीनंतर किती महिन्यांनी लस देण्यात यावी याचा कालावधी वाढवण्याचा सल्ला देण्यात आल्याचं म्हटलं आहे. जाणून घेऊयात या पॅनलने दिलेल्या महत्वाच्या सल्लांसंदर्भात
-
१) करोनामुक्त झाल्यानंतर नऊ महिन्यांनी संबंधित व्यक्तीला करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला पाहिजे.
-
२) करोनामधून मुक्त झाल्यानंतर नऊ महिन्यांनी लसीकरण केल्याने संसर्ग झाल्यामुळे नैसर्गिकरित्या शरीरामधील अॅण्टीबॉडीज वाढण्यास मदत होते, असं सांगण्यात आलं आहे.
-
३) लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही संसर्ग झालेल्या व्यक्ती करोनामुक्त झाल्यावर त्यांना चार ते आठ आठवड्यांनंतर पुढचा डोस देण्यात यावा.
-
४) सध्या करोनाची पहिली लस घेऊनही संसर्ग झालेल्या व्यक्तींना करोनामुक्तीच्या दोन आठवड्यांनी लस देण्यास परवानगी आहे. हा काळ आता दुप्पट ते चौपट करण्याच सल्ला देण्यात आलाय.
-
५) प्लाझ्मा उपचारांच्या मदतीने करोनावर मात केलीय त्यांनी लसीचा पहिला डोस देताना करोनामुक्त झाल्यानंतर किमान तीन ते आठ आठवड्यांचं अंतर ठेवावं.
-
६) सध्या प्लाझ्मा उपचाराने बऱ्या झालेल्या व्यक्तींचं लसीकरण कधी करावं यासंदर्भात कोणताच वेगळा नियम नाहीय. मात्र कोणत्याही दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी करोनामधून बरं झाल्यानंतर काही अंतराने लसीकरण करणं फायद्याचं असतं असं तज्ज्ञ सांगतात.
-
७) लसीकरणाआधी रॅपिड अॅण्टीजन टेस्टची गरज नसल्याचं पॅनलने म्हटलं आहे.
-
८) करोना लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी ही शिफारस करण्यात आली आहे. असं झाल्यास करोना संसर्गाचा धोका कमी होईल असं सांगण्यात आलंय.
-
९) सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ आठवडे असावं. सध्या हे अंतर चार ते आठ आठवडे आहे.
-
१०) लॅन्सेटनुसार १२ आठवड्यांचा अवधी दोन डोसांमध्ये असेल तर लसीचा परिणाम ८१.३० टक्क्यांनी वाढते. युनायडेट किंग्डममध्ये हाच नियम पाळण्यात आला.
-
-
१२) लसीकरण करण्याचा पर्याय गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी खुला ठेवला पाहिजे. सध्या गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना लस दिली जात नाही.
-
आरोग्य मंत्रालय यासंदर्भातील निर्णय पुढील काही दिवसांमध्ये घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार करोनामुक्त झाल्यानंतर लसीचा पहिला डोस घेण्यासाठी सहा महिन्यांचं अंतर सुरक्षित आहे.
-
सध्या देशामध्ये अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्यांनी पहिला डोस घेणाऱ्यांना आता प्राधान्य दिल्याचं चित्र दिसत आहे.
-
लसींचा अपव्यय टाळण्यासाठी केंद्राकडून राज्यांना वारंवार निर्देश देण्यात येत आहेत.

पितृपक्षात ‘या’ राशींना मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद! अफाट पैसा, धनसंपत्ती अन् मोठं यश, तर ‘या’ राशींच्या नशिबी संकट…