-
बनारस म्हणजेच वाराणसी शहराची जगभरामध्ये अध्यात्मिक शहर म्हणून ओळख आहे. गंगेच्या किनाऱ्यावर वसलेलं हे शहर केवळ तेथील संस्कृतीसाठीच नाही तर येथील लोक, संगीत आणि कलेसाठीही ओळखलं जातं. त्यामुळेच या शहराला सीटी ऑफ म्यूझिक म्हणूनही ओळखलं जातं. प्राचीन काळापासून गंगेच्या किनाऱ्यावर असणाऱ्या या शहरामध्ये अनेक मोठ्या कालाकारांनी साधना करुन आपआपल्या क्षेत्रात नाव कमवलं. सितारा देवी, पंडित किशन महाराज, गिरिजा देवी, पंडित राजन साजन मिश्रा, पंडित छन्नूलाल मिश्रांसारखी संगीत क्षेत्रातील अनेक मोठी नावं याच शहरामधून नवारुपास आली. शहनाईच्या मधूर स्वरांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणारे भारतरत्न बिस्मिल्लाह खानही याच बनारसमधले. मात्र आता संस्कृती वारसा जपणारं शहराबरोबरच येथील आणखीन एक गोष्ट शहराची ओळख बनणार आहे. ती म्हणजे रुद्राक्ष कनव्हेंन्शन सेंटर.
-
शिवलिंगाच्या आकाराची ही भव्य दिव्य वास्तू काशीमध्ये आहे. या इमारतीच्या आजूबाजूला रुद्राक्षच्या आकाराची १०८ शिल्प साकारण्यात आली आहे. त्यामुळेच या इमारतील रुद्राक्ष नाव देण्यात आलं आहे.
-
हे काशीमधी नवं कनव्हेन्शन सेंटर म्हणजेच संस्कृतिक केंद्र असणार आहे. रुद्राक्षच्या माध्यमातून काशीमधील कला, साहित्य आणि संस्कृतिक क्षेत्राला एक नवीन व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
-
या कनव्हेन्शन सेंटरमधील मुख्य सभागृह एवढं मोठं आहे की येथे एका वेळेस १२०० प्रेक्षक बसू शकतात. या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात आलीय. ऑडिटोरियममधील आसन व्यवस्थेमधील प्रत्येक रांगेतील पहिली खुर्ची ही पोर्टेबल आहे. गरज वाटेल तेव्हा ही खुर्ची काढून त्या ठिकाणी व्हिलचेअरवर असणाऱ्या दिव्यांगांची बसण्याची व्यवस्था करण्याची सोय आहे.
-
या कनव्हेन्शन सेंटरचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सेंट्रल कमांड. म्हणजेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येप्रमाणे विशेष नियोजन करण्याची सुविधा या ऑडिटोरियममध्ये आहे. म्हणजेच काही विशिष्ट रचनात्मक बदल करुन केवळ कमी संख्येने प्रेक्षक असले तरी हे ऑडिटोरियम वापरता येईल ज्यामध्ये लोकांना कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेता येईल.
-
मोठ्या ऑडिटोरियमसोबतच येथे तळमजल्यावर १५० लोकांची आसन क्षमता असलेला एक कॉन्फरन्स हॉलही बांधण्यात आला आहे.
-
बनारसमधील सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे पार्किंग. मात्र या कनव्हेन्शन सेंटरमध्ये यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
-
तीन एकरांमध्ये पसरलेल्या या सेंटरमध्ये १५० गाड्या पार्क करण्याची सुविधा आहे.
-
रुद्राक्ष कनव्हेन्शन सेंटरची रचना आणि बांधणी ही जपानी पद्धतीची आहे. संपूर्ण सेंटरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
-
या कनव्हेन्शन सेंटरमधील अनेक गोष्टी या ऑटोमॅटीक आहे. उदाहरण सांगायचं झाल्यास या सेंटरमध्ये मोशन सेन्सर लाइट्स आहेत. अगदी बाथरुम, वॉशरुम, ग्रीन रुम किंवा ड्रेसिंग रुममध्येही पाऊल ठेवताच आपोआप तेथील दिवे लागतात आणि कोणीही नसेल तेव्हा बंद होतात.
-
रुद्राक्ष कनव्हेन्शन सेंटरमध्ये वीजपुरवठा, पाणीपुरवठा, वातावरण थंड ठेवण्यासंदर्भातील यंत्रणा या साऱ्याचं नियोजन एकाच रुममधून केलं जातं.
-
वाराणसी शहरातील सर्वात प्राइम लोकेशनवर हे रुद्राक्ष कनव्हेन्शन सेंटर उभारण्यात आल्याने येथे मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील अशी अपेक्षा आहे.
-
एकूण १८६ कोटींचा खर्च करुन हे रुद्राक्ष कनव्हेन्शन सेंटर उभारण्यात आलं आहे.
-
या रुद्राक्ष कनव्हेन्शन सेंटरचा फायदा केवळ शहरातील लोकांना होणार नसून देश विदेशातून येणाऱ्या कलाप्रेमींनी होणार आहे. भारतामध्ये एवढ्या आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरुन अद्याप कोणतंही कनव्हेन्शन सेंटर उभारण्यात आलेलं नाही. लवकरच शिवलिंगाच्या आकाराची ही इमारत शहराची नवीन ओळख बनेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या रुद्राक्ष कनव्हेन्शन सेंटरचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक