-
भान हरपून खेळ खेळतो, दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा… भक्तिने भारलेला रिंगण सोहळा, पाहावा याचि देही याचि डोळा… अशा भक्तीपूर्ण वातावरणात देहूतील संत तुकाराम महाराज मंदिराच्या प्रांगणात रिंगण सोहळा पार पडला.
-
गेल्या वर्षी साधेपणाने आषाढी वारी सोहळा पार पडला होता. यंदा नेहमीप्रमाणे सोहळा होण्याची अपेक्षा होती, मात्र दुसऱ्या लाटेमुळे 'पायी वारी'वर निर्बंध घालण्यात आले. सरकारने मोजक्या दहा दिंड्यांना परवानगी दिली. त्यातही बसमधून दिंड्या पंढरपुरात दाखल होणार आहेत.
-
देहूतून संत तुकाराम महाराज यांची पालखी माऊलीच्या भेटीसाठी मार्गस्थ झाली. १ जुलै रोजी तुकोबांचा पालखी सोहळा मुख्य मंदिरात पार पडला होता.
-
पायी वारीला परवानगी नसल्यानं १ जुलैपासून देहूतील मुख्य मंदिराच्या अंगणातच सर्व रिंगण सोहळे पार पडले. गोल रिंगण, मेंढ्यांचं रिंगण, अश्व रिंगण हे सर्व रिंगण सोहळे पायी दिंड्या निघाल्यानंतर रस्त्यामध्ये पार पडतात.
-
आज (१९ जुलै) सकाळी मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी इनामदार वाड्यात टाळमृदंगाच्या गजरात पोहचली. तिथे पादुकांची आरती करून झाल्यानंतर एसटीमध्ये पादुका विसावल्या. यावेळी तुकोबांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
-
(सर्व फोटो : राजेश स्टीफन, इंडियन एक्सप्रेस)

Vaishnavi Hagawane Case: अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; धीर देताना म्हणाले, “मुलीला नांदवायचे नव्हते तर…”