-
करोना काळातील निर्बंध शिथिल करत अनलॉकबाबतची नवी नियमावली सोमवारी जाहीर केली होती. राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळणार होता. मात्र पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम होते. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
-
पण या निर्णयावर पुण्यातील व्यापारी महासंघाने नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे निर्बंध शिथील करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
-
पुण्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार आहेत. तर हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
-
पुण्यातील सर्व दुकानं एक दिवस वगळता सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
पुण्यातील हॉटेल-रेस्टॉरंट सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे) -
मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
-
मॉल्समध्ये फक्त दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
-
हॉटेल चालक आणि दुकानदारांना लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक आहे. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
-
पुण्यातील सर्व उद्यानं नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहेत. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
-
जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी दिली जाणार आहे. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
-
सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्हीटी रेट गेल्यास पुन्हा निर्बंध लावण्यात येणार आहे. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
-
पुणेकरांना मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
-
पुणे ग्रामीणमध्ये अद्यापही पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे. त्यामुळे तिथे लेव्हल तीनचे नियम लागू असणार आहेत. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
-
पुणे ग्रामीणमध्ये दुकानं, आस्थापने दुपारी ४ पर्यंतच सुरु राहतील. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
-
तसेच हॉटेल, रेस्टॉरंटही दुपारी ४ पर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)

Shefali Jariwala Death : शेफाली जरीवालाच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार