-
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटी पार्कमध्ये लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज या लहान मुलांसाठीच्या कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
-
कलिना विद्यापीठ आयटी पार्क येथे उभारण्यात आलेले लहान मुलांचे करोना काळजी केंद्र हे ५ हजार चौरस फूटांचे असून त्यात ३० रुग्णांच्या खाटा आहेत.
-
तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्रशस्त जागा आहे. हे केंद्र करोनाग्रस्त लहान मुलांना अलगीकरण व त्यांच्या उपचाराकरिता तयार करण्यात आले आहे.
-
याठिकाणी स्तनदा मातांना स्तनपानाकरिता स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. तसेच करोनाग्रस्त मुलांसोबत पालकांनाही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
मुलांसाठी मनोरंजन उपक्रम उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच, या केंद्रात लहान मुलांना दवाखान्यात आल्यासारखे वाटू नये व आनंददायी वातावरण असावे असा प्रयत्न करण्यात आला आहे.
-
मुलांवर महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील व खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत.
-
या केंद्रामध्ये ऑक्सिजनयुक्त अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. या करोना काळजी केंद्रात २४ तास स्वच्छता व सुरक्षितेसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
-
या ठिकाणी लहान मुलांना पोषक आहार देण्यात येणार आहे.
-
यावेळी, कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून वागा असे, आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले.
-
तसेच या सेंटरच्या भिंतींना रंगेबेरंगी रंग देण्यात आला आहे. तसेच बेडवर असलेल्या चादरीवर मिकी माऊस, मिनी माऊस यासारखे कार्टून्स दिसत आहे.

“हर्षल पाटीलनंतर पुढचा नंबर माझा”, ‘तो’ मेसेज वाचून जितेंद्र आव्हाड हादरले; मुख्यमंत्र्यांना विनंती करत म्हणाले…