-
अमेरिकेत इडा चक्रिवादळाने हाहाकार माजवला आहे.
-
या चक्रिवादळामुळे न्यूयॉर्क शहरात मुसळधार पाऊस कोसळत असून भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
-
या पुरामुळे गुरुवारी एका रात्रीत एकट्या न्यूयॉर्कमध्ये तब्बल ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.
-
अनेक जण हे स्वतःच्याच तळघरात कैद झाले होते आणि तिथेच पुरामुळे त्यांचा मृत्यू झाला.
-
वादळामुळे अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये विक्रमी पाऊस झाला आहे.
-
रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं असून सर्वत्र पाणी साचल्याने सबवे सेवा बंद झाली आहे.
-
न्यूयॉर्कमधील परिस्थिती तर इतकी भीषण आहे की, महापौर बिल दि ब्लासिओ यांनी एका रात्रीसाठी आणीबाणी घोषित केली होती.
-
इडा चक्रीवादळामुळे ईशान्य अमेरिकेला मोठा फटका बसला आहे.
-
वादळामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.
-
ला गार्डिया आणि जेएफके विमानतळ तसेच नेवार्क विमानतळावरून शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
-
विमानतळाचे टर्मिनल पावसाच्या पाण्याने भरलेले असल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसून आले आहे.
-
"आम्ही सगळे या पूरपरिस्थितीत सोबत आहोत. देशातील लोक एकमेकांना करण्यास तयार आहे," असं अध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी दक्षिणेकडील लुईझियाना राज्याच्या दौऱ्यापूर्वी म्हणाले.
-
लुईझियाना राज्याला इडा चक्रिवादळाचा मोठा फटका बसला असून तिथं अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.
-
न्यू जर्सीचे गव्हर्नर फिल मर्फी यांनी वादळामुळे २३ लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
-
वाहनांमध्ये अडकून बहुतांशी लोकांना मृत्यू झालाय.
-
न्यूयॉर्क शहरात १२ लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी ११ जणांना तळघरातून बाहेर पडता न आल्याने जीव गमवावा लागला.
-
(सर्व फोटो सौजन्य : Reuters)

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..