-
बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी गुजरातच्या सुरतमधील एका रेस्टॉरंटमधून “पाकिस्तानी फूड फेस्टिव्हल” लिहिलेला बॅनर हटवला.
-
यावेळी ‘जय श्री राम’ आणि ‘हर हर महादेव’ अशा घोषणा या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडून जाळून टाकले.
-
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, टेस्ट ऑफ इंडिया नावाच्या या रेस्टॉरंटने १२ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान १० दिवसांचा फूड फेस्टिव्हल आयोजित केला होता.
-
या फूड फेस्टिव्हलचा प्रचार करण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले होते.
-
सुरतमधील रिंगरोडवरील जुन्या सबजेलजवळ हे बॅनर लावण्यात आले होते.
-
बॅनरचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होताच बजरंग दलच्या सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला.
-
त्यांनी घटनास्थळी पोहोचून तो बॅनर खाली उतरवला आणि पेटवून दिला.
-
त्यांनी रेस्टॉरंटचे मालक संदीप दावर यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी फूड फेस्टिव्हलला पाकिस्तानचे नाव दिल्याबद्दल माफी मागितली.
-
पाकिस्तानी खाद्यपदार्थांवर आधारित पूर्वीच्या थीमच्या जागी ‘सीफूड फेस्टिव्हल’ म्हणून हे फेस्टिवल साजरे करण्यात येईल, असे बजरंग दलाचे नेते देवीप्रसाद दुबे यांनी सांगितले.
-
देवीप्रसाद दुबे म्हणाले, “आम्हाला सोशल मीडियावरून होर्डिंगबद्दल माहिती मिळाली आणि त्यानंतर आम्ही दक्षिण गुजरातचे संयोजक दिनेश नावडिया यांच्याकडून परवानगी घेतली.
-
नंतर, आम्ही घटनास्थळी गेलो आणि होर्डिंग खाली उतरवले.
-
आम्ही मालक दावर यांनाही फोन केला आणि त्यांनी असा फूड फेस्टिव्हल का आयोजित केला आहे, अशी विचारणा केली. नंतर त्यांनी माफी मागितली.”
-
“आम्ही फूड फेस्टिव्हलमध्ये यापुढे ‘पाकिस्तानी’ शब्द वापरणार नाही. कारण त्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या जातात.
-
जेव्हा आम्ही हा शब्द वापरत होतो तेव्हा आम्हाला वाटले की काही लोकांना तो आवडणार नाही, परंतु या शब्दामुळे अशी घटना घडले हे माहित नव्हते,” असे संदीप दावर म्हणाले.
-
(फोटो सौजन्य – एएनआय आणि व्हिडीओतून घेतलेले स्क्रिनशॉट)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग