-
भारतीय रेल्वे मंत्रालयाने चिनाब नदीवरील जगातील सर्वात मोठ्या आर्क ब्रिजचा फोटो पोस्ट केला आहे.
-
यात या विशाल पुलाची भव्यता आणि त्याची उंची पाहता येत आहे.
-
या ब्रिजमुळे उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग जम्मू-काश्मीरला उर्वरित भारताशी जोडणार आहे.
-
हा ब्रिज भारतीय रेल्वेच्या इंजिनियरिंगचा अद्भूत नमुना म्हणून पाहिला जातो आहे.
-
या ब्रिजची लांबी १ हजार ३१५ मीटर लांब आणि ३५९ मीटर उंच आहे.
-
हा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज आहे. उंचीमध्ये हा ब्रिज आयफेल टॉवरलाही खुजा ठरवत आहे.
-
या प्रकल्पातील सर्वात कठीण भाग म्हणजे या ब्रिजमधील दोन आर्कला जोडणारा ५.६ मीटरचा धातूचा तुकडा त्याच्या आराखड्यानुसार बसवणं.
-
मात्र, रेल्वे विभागाने हे कामही यशस्वीपणे करत दोन्ही आर्क जोडले.

Ajit Pawar : माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “मंगळवारी…”