-
कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत आज (६ मे) १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली वाहण्यात आली.
-
शाहू समाधी स्थळ येथे शाहू छत्रपती, संभाजी छत्रपती, विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांनी स्तब्ध उभे राहून अभिवादन केले.
-
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिना निमित्त सकाळी १० वाजता पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांनी १०० सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन केले.
-
स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व राजर्षी शाहू समाधी स्थळ येथे शिव-शाहुज्योतीचे स्वागत महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
-
कोल्हापूरमधील अभिवादनावेळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजी छत्रपती इत्यादी उपस्थित होते.
-
बाळासाहेब थोरात छत्रपती शाहू महाराज यांना पुष्पांजली अर्पण करताना.
-
अभिवादन सभेला कोल्हापुरात उपस्थित राजकीय क्षेत्रातील मान्यवर.
-
अभिवादन सभेला उपस्थित सर्वसामान्य नागरिक.
-
शाहू महाराज यांच्या अभिवादन सभेला उपस्थिती NCC चे विद्यार्थी व इतर…
-
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर निर्मित “माणगाव परिषद १९२०” लघुपटाचे थेट प्रसारण करण्यात आले.
-
सोनाली, ता.कागल येथे देखील १०० संकेंद स्तब्ध उभे राहून शाहू महाराज यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
-
उद्योग भवनमधील सर्व कार्यालयाच्या वतीने लोकराजा शाहू महाराज यांना आदरांजली अर्पण केली.
-
जळगावमधील चोपडा महाविद्यालयातही राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं.
-
वाशिममधील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात १०० सेकंद स्तब्ध उभे राहून शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले.
-
महाराष्ट्रातच नाही, तर अगदी तेलंगणामधील हैदराबादमध्ये चारमिनार या ठिकाणी लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना १०० सेकंद स्तब्ध उभं राहून आदरांजली वाहण्यात आली.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल